आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वेगळ्या विदर्भाचा प्रस्तावच नाही, भाजप- शिवसेनेत फूट पाडण्याचा प्रयत्न - फडणवीस

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्वतंत्र विदर्भाच्या विराेधात शिवसेना अामदारांनी साेमवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासमक्ष विधिमंडळाच्या पायऱ्यावर निदर्शने केली. - Divya Marathi
स्वतंत्र विदर्भाच्या विराेधात शिवसेना अामदारांनी साेमवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासमक्ष विधिमंडळाच्या पायऱ्यावर निदर्शने केली.
मुंबई - विदर्भाच्या विकासासाठी सरकार कटिबद्ध असून या भागाला स्वतंत्र राज्याचा दर्जा देण्याचा विषय राज्याच्या नसून केंद्र सरकार आणि संसदेच्या अखत्यारीत अाहे. स्वतंत्र विदर्भाचा प्रस्ताव राज्य सरकारने दिलेला नाही. या विषयावर भाजप आणि शिवसेना या दाेन्ही पक्षांची भूमिका स्पष्ट अाहे, मात्र विरोधक विदर्भाच्या मुद्द्यावर राजकारण करून या पक्षात फूट पाडण्याचा प्रयत्न करीत अाहेत, असा आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी विधानसभेत केला. अखंड महाराष्ट्राच्या मुद्द्यावरून विराेधकांच्या गोंधळामुळे दिवसभरासाठी सभागृहाचे कामकाज तहकूब करण्यात आले.

विधानसभेचे कामकाज सुरू हाेताच शिवसेनेचे प्रकाश आबिटकर यांनी विदर्भाच्या मुद्द्यावर मुख्यमंत्र्यांनी भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी केली. या मागणीला पाठिंबा देत काँग्रेस-राष्ट्रवादीच्या सदस्यांनी अखंड महाराष्ट्राचा मुद्दा उपस्थित करीत सभागृहात गोंधळ घालण्यास सुरुवात केली. ‘अखंड महाराष्ट्र माझा’ असे लिहिलेले फलक गळ्यात घालून हे सदस्य सभागृहात आले होते. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी याबाबतचा स्थगत प्रस्ताव देत प्रश्नोत्तराचा तास रद्द करून अखंड महाराष्ट्राच्या मुद्द्यावर चर्चा करावी, अशी मागणी केली. मात्र ‘गेल्या आठवड्यात याच मुद्द्यावर सभागृहाचे काम बंद पडले होते त्यामुळे आज कामकाज करावे, संध्याकाळपर्यंत सरकार या विषयावर आपली भूमिका स्पष्ट करील,’ असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. तेव्हा ‘या विषयावर शिवसेना व मुख्यमंत्र्यांमध्ये फिक्सिंग झाले असून सत्तेतील शिवसेना अामदार चर्चेची मागणी करतात आणि मुख्यमंत्री उत्तर देतात,’ असा अाराेप विखेंनी केला. तसेच आमच्या प्रस्तावाचे काय झाले? असा सवालही विचारला.
पुढे वाचा...

> विदर्भाचा विकास करणार : मुख्यमंत्री
> राजदंड उचलण्याचा प्रयत्न
> राजीनामा द्या : वळसे
> ‘फिक्सिंग’ वगळले
> जनतेचे प्रश्न खाेळंबले : भाजप