Home »Maharashtra »Mumbai» No Public Prosecutor Get The Sudam Munde

सुदाम मुंडेविरोधात सरकारी वकील मिळेना

प्रतिनिधी | Jan 19, 2013, 02:56 AM IST

  • सुदाम मुंडेविरोधात सरकारी वकील मिळेना

मुंबई - स्त्री भ्रूणहत्यांविरोधात राज्यभरात जागर सुरू असताना राज्य सरकार मात्र भ्रूणहत्येच्या आरोपाखाली कोठडीत असलेल्या परळी येथील डॉ. सुदाम मुंडेला शिक्षा व्हावी यासाठी गंभीर नसल्याचे दिसते. मुंडेविरोधातील खटला लढवण्यास सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी नकार देऊन पाच महिने लोटले तरी त्यांच्या जागी दुस-या सरकारी वकिलाची अद्याप नियुक्ती झालेली नाही.

याबाबत उज्ज्वल निकम म्हणाले की, आपण या खटल्यातून माघार घेतल्यानंतर गृहमंत्र्यांना आपल्याशी चर्चा करण्याची गरज वाटली नाही. या प्रकरणाचे आरोपपत्र दाखल करताना त्यात खूप चुका झाल्या असून मुंडे यांना या प्रकरणातून सहीसलामत सुटण्यासाठी मधले मार्ग ठेवण्यात आल्याचेही कळते. साक्षीदारांवर दबाव येऊ शकतो. त्यामुळे हा खटला जिल्ह्याबाहेर चालवावा, अशी विनंती पोलिस अधीक्षकांनी पत्राद्वारे गृह विभागाला केली होती. मात्र, त्यावरही शासनाने हालचाल केली नाही.

Next Article

Recommended