आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • No Relief From Supreme Court To Ncp Leader Chhagan Bhujbal

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सुप्रीम कोर्टाचाही दिलासा नाही: छगन भुजबळांविरोधात भ्रष्टाचाराची चौकशी होणारच

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ आणि इतरांविरुद्धच्या भ्रष्टाचाराच्या आरोपांची विशेष तपास पथकामार्फत (एसआयटी) चौकशी करण्याच्या मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी नकार दिल्याने भुजबळांची एसआयटीमार्फत चौकशी सुरूच राहणार आहे.

इराम टी. शेख यांनी उच्च न्यायालयाच्या आदेशाला आव्हान देणारी याचिका दाखल केली होती. आम्ही या याचिकेवर सुनावणी करणार नाही, असे सरन्यायाधीश एच. एल. दत्तू आणि न्यायमूर्ती ए. के. सिकरी यांच्या न्यायपीठाने सांगितले. न्यायालयीन प्रक्रियेच्या आडून आम आदमी पार्टी राजकीय लाभ उपटू पाहत असल्याचा आरोप शेख यांचे वकील अभिषेक मनू सिंघवी यांनी केला होता. नवी दिल्लीतील नवीन महाराष्ट्र सदनाच्या बांधकामात झालेल्या भ्रष्टाचाराची लाचलुचपत प्रतिबंधक पथकमार्फत चौकशी करण्याची परवानगी राज्य सरकारने नुकतीच दिली आहे. त्यातच ही चौकशीही सुरूच राहणार आहे. एसआयटीमध्ये दक्षता संचालनालय आणि राज्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक पथकाच्या अधिकार्‍यांचा समावेश असणार आहे.

प्रकरण काय?
आघाडी सरकारचे सार्वजनिक बांधकाममंत्री भुजबळ यांनी खासगी संस्थांना दिलेल्या कंत्राटांच्या बदल्यात भुजबळांंच्या मुंबई एज्युकेशन ट्रस्टला निधी दिला, असा आरोप ‘आप’ने उच्च न्यायालयातील याचिकेत केला होता. १८ डिसेंबर रोजी न्यायालयाने भुजबळ, मुलगा पंकज पुतण्या समीर यांच्या एसआयटी चौकशीचे आदेश दिले होते.

भुजबळांविरुद्ध ११ तक्रारी
भुजबळांविरुद्ध लाचलुचपत खात्याकडे ११ तक्रारी आहेत. डीबी रिअ‍ॅल्टीज इंडियाबुल्ससारख्या बड्या कंत्राटदारांनी भुजबळांना लाच दिल्याचा आरोप आहे. एका प्रकरणात डीबी रिअ‍ॅल्टीने त्यांना दिलेल्या वांद्रेतील एमआयजी कॉलनी बांधकाम कंत्राटाच्या बदल्यात भुजबळांच्या परवेझ कन्स्ट्रक्शनच्या खात्यात २१ कोटी रुपये ट्रान्सफर केले होते.

८२.३६ कोटींची लाच :भुजबळ, त्यांच्या कुटुंबीयांच्या मालकीच्या कंपन्यांना कंत्राटदारांनी एकूण ८२.३६ कोटी रुपयांची लाच दिल्याचा आरोप आहे.

एमईटीचे संचालक बनावट : मुंबईएज्युकेशन ट्रस्ट या भुजबळांच्या संस्थेत ‘डमी कंपन्यां’चे संचालक ‘माळी’ आहेत.

राष्ट्रवादीमध्ये भ्रष्टांना थारा नाही : अजित पवार
कोणाही भ्रष्टाचार्‍याला राष्ट्रवादी पाठीशी घालणार नाही, असे पक्षाचे नेते पवार यांनी सांगितले. कोल्हापूरच्या राष्ट्रवादीच्या महापौर तृप्ती माळवींवर १६ हजारांची लाच घेतल्याचा गुन्हा दाखल झाला. त्यावर त्यांनी हे स्पष्टीकरण दिले.

भुजबळ इतरांविरुद्धच्या आरोपांची एसआयटीमार्फत खुली चौकशी करावी. एसआयटीमध्ये अंमलबजावणी संचालनालयाच्या तसेच राज्याच्या भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाच्या अधिकार्‍यांचा समावेश असेल. एसआयटी चौकशी २८ फेब्रुवारीपर्यंत पूर्ण करावी. २८ फेब्रुवारीपर्यंत चौकशी पूर्ण झाल्यास अंतरिम अहवाल सादर करावा, असे हायकोर्टाने म्हटले होते.