आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

3 महिन्यांपासून कृषी विद्यापीठ, जि. प. कर्मचार्‍यांना पगार नाही

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - वित्त विभागाकडून कर्मचार्‍यांच्या पगारासाठी पैसे दिले जात असतानाही सचिव स्तरावर पगाराचे पैसे दिले जात नसल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे याबाबत अनेक तक्रारी आल्यानंतर त्यांनी याची गंभीर दखल घेऊन कर्मचार्‍यांचे पगार देण्याबाबत सचिवांना तंबी देणारे पत्र २२ जून रोजी पाठवले आहे.

राज्यात एकूण ३४ जिल्हा परिषदा, चार कृषी विद्यापीठे तसेच अनेक अनुदानित संस्था आहेत. यात पाच लाख ८१ हजार ७७४ कर्मचारी असून त्यांना 'सेवार्थ' ऑनलाईन प्रणालीमार्फत दरमहा वेतन दिले जाते. पैकी २२ जिल्हा परिषदां तसेच चार कृषी विद्यापीठाच्या लाखो कर्मचार्‍यांना गेल्या तीन महिन्यांपासून पगारच मिळालेला नाही.अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी राज्याचा दौरा केला तेव्हा त्यांच्याकडे कर्मचार्‍यांनी पगार मिळाल्याची तक्रार केली. मुनगंटीवार यांनी याची तातडीने दखल घेऊन सोमवारी वित्त विभागाचे अवर मुख्य सचिव एस.के. श्रीवास्तव यांच्यासह सर्व विभागाच्या प्रधान सचिवांना कर्मचार्‍यांचे पगार त्वरित देण्याचे आदेश पत्राद्वारे दिले आहेत.

पगार मिळाल्यास अधिकारीच जबाबदार
प्रत्येकविभागाला वेतनासाठी व्यवहार्य प्रणाली उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. असे असूनही कर्मचार्‍यांचे पगार वेळेवर दिले गेले नाहीत तर त्यासाठी सबंधित विभागाच्या आहरण संवितरण अधिकार्‍यांना जबाबदार धरले जाणार आहे. अर्थमंत्र्यांनी पाठवलेल्या पत्रात असे स्पष्ट करण्यात आले आहे.
बातम्या आणखी आहेत...