आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • No ST Reservation To Dhangar Caste, Says Tribal Development Minister Vishnu Savara

धनगर समाजाला आदिवासींचे आरक्षण देणे अशक्य; मंत्री सावरांचा फडणवीसांना घरचा आहेर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धनगर समाजाला आरक्षण देणार असल्याची ग्वाही देताच त्यांच्याच मंत्रिमंडळातील आदिवासी विकासमंत्री विष्णू सवरा यांनी सरकारला घरचा आहेर दिला आहे. धनगर समाजाला आदिवासी आरक्षण देणे अशक्य आहे. धनगर समाजाला आदिवासी गटात आरक्षण देण्याच्या विरोधात सर्वपक्षीय 24 आमदार आणि 4 खासदार खंबीरपणे उभे राहतील असेही आदिवासी मंत्री सवरा यांनी म्हटले आहे.
लोकसभा व विधानसभा निवडणुकी आधी धनगर समाजाला आरक्षणाबाबत दिलेले वचन आम्ही पूर्ण करणार आहोत. भाजप-शिवसेना महायुती या शब्दापासून मागे फिरणार नाही, अशी ग्वाही देतानाच धनगर आरक्षणाबाबत पंधरा दिवसांत महाधिवक्त्यांसोबत बैठक घेण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धनगर समाज संघर्ष समितीच्या अधिवेशनात सोमवारी नागपूरात केली होती.
आदिवासींचे आरक्षण कमी करून धनगर समाजाला आरक्षण देण्यात येणार नसल्याचे फडणवीस यांनी स्पष्टपणे म्हटल्यानंतर आदिवासी मंत्री विष्णू सवरा यांनी घाईगडबडीने आजचे वक्तव्य केल्याचे दिसून येत आहे.