आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वारिस पठाण निलंबनप्रकरणी काँग्रेसचा यू-टर्न, निलंबनाला पाठिंबा नाही- विखे पाटील

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- भारत माता की जय’अशी घोषणा देण्यास नकार देणा-या एमआयएम आमदार वारिस पठाण यांच्यावरील कारवाईला पाठिंबा देणे ही काँग्रेसची चूक असल्याचे काँग्रेसचे खासदार हुसेन दलवाई यांनी पक्षाला घरचा अहेर देताच काँग्रेस पक्षाने यू-टर्न घेतला आहे. वारिस पठाण यांचे निलंबन करताना चूक झाली आहे. त्यामुळे वारिस यांच्या निलंबनाला काँग्रेसचा पाठिंबा नाही अशी भूमिका विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी नव्याने घेतली आहे.
विधिमंडळाच्या कामकाजात सभापतींनी कायदा लक्षात घेणे गरजेचे होते. एखाद्या आमदारावर अशी जबरदस्ती करणे चुकीचे आहे. या प्रकरणात काँग्रेस पक्षानेही निलंबनाला पाठिंबा देऊन चूक केल्याचे मत हुसेन दलवाई यांनी मांडले. त्याचवेळी एखद्या आमदाराने ‘भारत माता की जय’ न म्हणणं गैर असल्याचे त्यांनी सांगितले.
मागील आठवड्यात विधानसभेत भाजपचे आमदार राम कदम यांनी ‘भारत माता की जय’ मुद्दा उपस्थित केला होता. यावेळी त्यांनी वारीस पठाण यांच्याकडे पाहुन भारत माता की जय अशी घोषणा दिली. पण, वारिस पठाण यांनी आपण भारत माता की जय म्हणणार नाही असे विधानसभेत सांगितले. त्यामुळे सभागृहात एकच गोंधळ उडाला. सर्वपक्षीय आमदारांनी वारिस पठाण यांना निलंबित करण्याची मागणी केली. त्यानुसार वारिस पठाण यांना अधिवेशन संपेपर्यंत निलंबित करण्यात आले. या निलंबनाला काँग्रेससह राष्ट्रवादीने पाठिंबा दिला होता. आता मात्र काँग्रेसने यू-टर्न घेतला आहे.
बातम्या आणखी आहेत...