आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शाेध शाेध शाेधले, पण संशयित नाही सापडले! उरणमधील संशयीत अतिरेक्यांचा धोका कायम

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उरण (जि. रायगड) येथे संशयित घुसल्याच्या पार्श्वभूमीवर मुंबईत पाेलिसांकडून शुक्रवारी ठिकठिकाणी वाहनचालकांची तपासणी सुरू हाेती. - Divya Marathi
उरण (जि. रायगड) येथे संशयित घुसल्याच्या पार्श्वभूमीवर मुंबईत पाेलिसांकडून शुक्रवारी ठिकठिकाणी वाहनचालकांची तपासणी सुरू हाेती.
मुंबई - उरणमध्ये विद्यार्थ्यांनी पाहिलेल्या संशयित दहशतवाद्यांच्या शोधासाठी शुक्रवारी दुसऱ्या दिवशीही संयुक्त कोंबिंग ऑपरेशन सुरू होते. मात्र ४८ तास उलटूनही या ऑपरेशनमध्ये सुरक्षा पथकांच्या हाती काहीही लागलेले नाही. मात्र, उरणमध्ये अतिरेकी उतरल्याची माहिती आता गुप्तचर यंत्रणांनाही लागली असून खबरदारीचा उपाय म्हणून येथील नौदल शस्त्रागारातील प्रवेशावर शुक्रवारी दुपारपर्यंत निर्बंध घालण्यात आले होते.

नौदलातील क्षेत्रात प्रवेश बंद करण्यात आला होता. नौदल वेस्टर्न कमांडच्या शस्त्रागारातील कमांडर मॅथ्यू आणि नवी मुंबईचे पोलिस आयुक्त हेमंत नगराळे यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक पार पडली. कोम्बिंग ऑपरेशनमध्ये एटीएस, एनएसजी, नौदल सहभागी झाले होते. मोरा ते बोरी आणि केगाव बाजारपूरचा परिसर या ऑपरेशनद्वारे पिंजून काढण्यात आला.
विद्यार्थ्यांकडील माहिती आणि गुप्तचर यंत्रणेंनी दिलेल्या माहितीच्या आधारे दहशतवादी उरणमध्ये शिरल्याचे अनुमान काढले जात आहेत. शाळा आणि उरणमधील महत्त्वाच्या प्रकल्प हे अतिरेक्यांचे लक्ष्य असल्याचे लक्षात आल्याने सर्वच शाळांना सुटी देण्यात आली होती. अतिरेक्यांचा ठावठिकाणा न मिळाल्याने शाळा शनिवारीही बंद ठेवल्या जातील, असे सांगण्यात आले. ज्या शाळेच्या परिसरात संशयित अतिरेक्यांना पाहण्यात आले, त्या उरण एज्युकेशन सोसायटी या शाळेत सुरक्षा यंत्रणांनी मध्यरात्री कोम्बिंग केले. अतिरेक्यांचा शोध लागत नसला तरी कुठलीही जोखीम घेण्याची तयारी सुरक्षा यंत्रणांची नाही. शोध मोहिमेत सामील झालेल्या जवानांनी रिकाम्या घरांबरोबरच इमारतींमधील रिकामे फ्लॅटमध्ये शोध मोहीम राबवली.
उरणमधून बाहेर जाणाऱ्या एनएमएमटी आणि एसटी बसेस पूर्णत: तपासूनच पाठवल्या जात होत्या. खासगी वाहनेही यातून सुटली नाहीत. प्रवाशांच्या बॅग तपासून त्यांना सोडले जात होते. मुंबईकडे भाऊचा धक्का आणि ससून डॉककडे जाणाऱ्या प्रवाशी फेरी लाँचेसच्याही प्रवाशांची सखोल चौकशी केली जात होती. उरणबाहेर जाणारे सगळे मार्ग सील करण्यात आले आहेत. खात्री केल्याशिवाय तपास मोहीम थांबवली जाणार नाही, असे पोलिस आयुक्त नगराळे यांनी सांगितले. उरणनजीकच्या बुचर बेटावरील आणि समुद्रातील गस्त अधिक कडक करण्यात आली असून अरबी समुद्रातील संयुक्त गस्त अधिक सतर्क करण्यात आली आहे. ओएनजीसीच्या पीरवाडी किनाऱ्यावरील गस्तही वाढवण्यात आली असून प्रकल्पाला सेंट्रल सिक्युरीटीची सुरक्षा देण्यात आली आहे. जेएनपीटीतही प्रवेशावर निर्बंध घालण्यात आले आहेत. या बंदराच्या समुद्र कक्षेतील सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांकडील माहिती आणि गुप्तचरांनी दिलेला इशारा लक्षात घेता दहशतवादी उरणमध्ये आले असावेत, हे लक्षात घेऊन नौदल शस्त्रागारातील सुरक्षा अधिक कडक करण्यात आली आहे. तुनीरचा मांगिरा आणि केगावचा स्कोल हे दोन्ही दरवाजे बंद करण्यात आले होते. केवळ मोरा गेटवरून प्रवेश दिला जात होता.
पुढे वाचा...
> कोकण समुद्र किनाऱ्यांवर बारकाईने लक्ष
> पुन्हा २६/११ हाेणार नाही : गृह राज्यमंत्री
बातम्या आणखी आहेत...