आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • No Take Off Drone, Light Plane In Mumbai Mumbai Police

मुंबईत ड्रोन, हलकी विमाने उडवण्यावर बंदी - सुरक्षेच्या कारणास्तव पोलिसांचे आदेश

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - मुंबईवर हवाई मार्गाने हल्ला हाेण्याबाबतचे अलर्ट केंद्रीय गुप्तचर यंत्रणांकडून मिळाल्याने पोलिसांनी मुंबई शहर आणि उपनगर परिसरात हाय अलर्ट जारी केला आहे. इतकेच नव्हे तर पुढील महिन्याभरासाठी मुंबई शहर व परिसरात ड्रोन, पॅराग्लायडिंग तसेच रिमोट कंट्रोलद्वारे उडवण्यात येणा-या हलक्या विमानांच्या उड्डाणावरही बंदी घातली आहे.

मुंबई पोलिसांना सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. ४ जुलै ते येत्या २ ऑगस्ट या एका महिन्याच्या कालावधीत मुंबई आणि परिसरात ड्रोन विमाने, पॅराग्लायडिंग तसेच रिमोट कंट्रोलद्वारे उडवण्यात येणा-या हलक्या वजनांच्या विमानांच्या उड्डाणावर बंदी घालण्यात आली आहे. हवाई मार्गाने कमी उंचीवरून उडणा-या अशा हलक्या आणि छोट्या विमानांच्या साहाय्याने एअर मिसाइल्स किंवा बॉम्ब फेकले जाऊ शकतात, ही बाब ध्यानात घेऊन तसेच या शक्यतेशी मिळतेजुळते अलर्ट केंद्रीय गुप्तचर यंत्रणाद्वारे मिळाल्याने सुरक्षेचे उपाय म्हणून पोलिसांनी हे आदेश जारी केले आहेत. या कालावधीत कोणीही ड्रोन, पॅराग्लायडिंग किंवा रिमोट कंट्रोलद्वारे उडवल्या जाणा-या विमानांचे उड्डाण केल्यास भादंविच्या कलम १८८ अंतर्गत कारवाई केली जाईल, अशी माहिती पोलिस उपायुक्त संजय बारकुंड यांनी दिली.