आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • No Talks Yet On Congress NCP Seat Sharing For LS: Manikrao Thakre

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मंत्र्यांना निवडणुकीत उतरवण्याची गरज काय?

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - काँग्रेसकडे सक्षम उमेदवार असल्यामुळे पक्षाच्या मंत्र्यांना लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याची गरज नसल्याचे वक्तव्य करत प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसला टोला लगावला.

आगामी लोकसभा निवडणुकीत कुठल्याही परिस्थितीत दोन अंकी संख्याबळ गाठायचेच, या इष्रेने झपाटलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसने पक्षाच्या ज्येष्ठ मंत्र्यांना निवडणुकीत उतरवण्याचे मनसुबे रचले आहेत. काँग्रेसचे संख्याबळ वाढवण्यासाठी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनीदेखील अशीच पावले उचलण्याचे सूतोवाच नुकतेच केले होते. त्या पार्श्वभूमीवर माणिकरावांनी निवडणुकीसाठी पक्षाचे उमेदवारच सक्षम असल्यामुळे मंत्र्यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याची गरज नसल्याबाबत केलेले वक्तव्य महत्त्वपूर्ण मानले जात आहे. महाविद्यालयीन निवडणुका पुन्हा सुरू करण्यासंदर्भातही त्यांनी अनुकूलता दर्शवली. पूर्वी शिवसेनेत असताना 1993 मध्ये राज ठाकरे यांनीच तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांची भेट घेऊन महाविद्यालयीन निवडणुका बंद करण्याची मागणी केली होती. त्यानंतर या निवडणुका बंद झाल्या. आता तेच निवडणुका सुरू करण्याची मागणी करत आहेत, याकडे ठाकरे यांनी लक्ष वेधले.