आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शरद पवार टार्गेट नाहीत, पुण्यालाही जाणार नाही - राज यांची समेटाची भाषा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - राष्ट्रवादीचे नेते शरद पवार हे माझे कधीच टार्गेट नव्हते. त्यांच्यावर मी टीकाही केलेली नाही. केंद्रीय कृषिमंत्री म्हणून त्यांना काही प्रश्न विचारले होते, असे स्पष्टीकरण मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी सोमवारी दिले. राष्‍ट्रवादीच्या नेत्यांनी आव्हान दिले होते म्हणून 7 तारखेला पुण्यात येणार असल्याचे जाहीर केले होते. परंतु पुण्यात कोणतीही सभा किंवा जाहीर कार्यक्रम नव्हता, असे राज यांनी स्पष्ट केले.

पत्रकारांशी बोलताना राज म्हणाले, राज्यातील दुष्काळी परिस्थिती आणि विकासाबाबत बोलत राहीन. 1999 पासून अर्थ, ऊर्जा, सिंचन, गृह आणि बांधकाम ही खाती राष्ट्रवादीकडे आहेत. त्यामुळे त्यांच्यावर टीका होणे स्वाभाविक आहे. राज्यात दुष्काळ असताना आयपीएलचे सामने खेळवले जाऊ नयेत, असे आपले ठाम मत असून सत्ताधा-यांनी याचा विचार करावा,असे आवाहनही त्यांनी केले.
पुण्यात जाण्यासंबंधी राष्‍ट्र वादीच्या खासदार वंदना चव्हाण यांनी पत्रक काढून वादावर पडदा टाकला आहे. आपल्यालाही वाद वाढवण्यात स्वारस्य नसल्याचे राज यांनी म्हटले आहे.