आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • No Use Of Children In Election Mumbai High Court

निवडणुकीमध्ये लहान मुलांच्या वापरावर निर्बंध, मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - निवडणूक संबंधित कामांत लहान मुलांचा वापर करणा-या राजकीय पक्षांना योग्य शिक्षेची तरतूद करण्याची सूचना मुंबई उच्च न्यायालयाने केंद्रीय निवडणूक आयोगाला केली आहे. निवडणूक आयोग अशा पक्षांविरुद्ध कोणती कारवाई करणार आहे, अशी विचारणाही उच्च न्यायालयाने केली आहे.

न्यायमूर्ती अभय ओक यांच्या पीठाने एका आठवड्यात या कारवाईचे स्वरूप जाहीर करण्याचे आदेश निवडणूक आयोगाला दिले आहेत. या संदर्भात आयोगाने शपथपत्र दाखल केले आहे. लहान मुलांना निवडणूक काम, प्रचार मोहिमांमध्ये वापरले जाऊ नये, असे आयोगाने स्पष्ट केले आहे. मात्र असे झालेच, तर कोणती कारवाई केली जाईल? याविषयी स्पष्टीकरण आयोगाकडे मागवण्यात आले आहे. पुणे येथील चेतन भुतडा यांच्या जनहितार्थ याचिकेवर सुनावणी करताना मुंबई उच्च न्यायालयाने हे आदेश दिले आहेत.