आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भटके विमुक्त समिती बरखास्त

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - भटक्या विमुक्तांचा समावेश अनुसूचित जाती, जमातीत होण्यासाठी नेमल्या अभ्यास समितीकडून आठ वर्षांत काडीमात्र काम झाले नाही. चार वेळा मुदतवाढ देऊनही वर्षातून केवळ दोनच बैठका झाल्या. त्यामुळे सरकारने मुदतवाढ नाकारून अशोक अगरवाल समिती बरखास्त केली. आता नवीन अध्यक्षांची नेमणूक करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

भटक्या जाती, जमातींचा अभ्यास करून त्यांच्या प्रथा, परंपरा, रूढी, रीतीरिवाज, सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक दर्जाचा अभ्यास करून अहवाल केंद्राला दिला जाणार आहे. त्यासाठी राज्याने 23 ऑगस्ट 2004 रोजी निवृत्त न्यायाधीश अशोक अगरवाल यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली होती.