आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संजय दत्तच्या विरोधात अजामीनपात्र वॉरंट, निर्मात्याला धमकी दिल्याचे 15 वर्ष जुने प्रकरण

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - संजय दत्तच्या विरोधात एका 15 वर्षे जुन्या प्रकरणात अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आले आहे. एएनआय या वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार शकील नुराणी यांना धमकी दिल्या प्रकरणी हे वॉरंट जारी करण्यात आले आहे. मुंबईत अंधेरीतील महानगर दंडाधिकाऱ्यांनी  हे वॉरंट जारी केले आहे. कोर्टाने याआधीही संजय दत्तच्या विरोधात समन्स जारी केले होते.
 
2002 चे प्रकरण 
- हे प्रकरण 2002 चे आहे. शकील नुराणी यांनी संजय दत्तला चित्रपट 'जान की बाजी' साठी 50 लाख रुपये देऊन साईन केले होते. पण संजय दत्तने अर्ध्यातच चित्रपट सोडला. त्यामुळे नुराणींना 5 कोटींचे नुकसान झाले.  
- शकील यांनी जेव्हा संजय दत्तशी याबाबत संपर्क केला त्यावेळी त्यांना जीवे मारण्याची धमकी मिळाली असा आरोप आहे. नुराणी यांना अंडरवर्ल्डकडूनही धमकी आल्याचा आरोप आहे. 
 
हायकोर्टानेही पाठवली होती नोटीस 
- याच प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयानेही संजय यांच्या घरावर जप्तीची नोटीस पाठवली होती. 
- नुराणी यांनी आरोप केला की, संजय दत्त यांचे अंडरवर्ल्ड कनेक्शन सर्वांनाच माहिती आहे. 
- संजय दत्त यांनीही कोर्टात नुराणी यांच्या अंडरवर्ल्ड कनेक्शनचा मुद्दा उचलला होता. 
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...