आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मराठा तरुणांसाठी बिनव्याजी कर्ज; महामंडळाच्या याेजनेचा अखेर जीअार निघाला

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- आर्थिक मागास समाजातील तरुणांना व्यवसायासाठी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळामार्फत आखलेल्या कर्ज व्याज परताव्याच्या तीन योजनांना राज्य शासनाने मान्यता दिली अाहे. त्याबाबतचा शासन निर्णय मंगळवारी काढण्यात अाला. महसूल मंत्री तथा मराठा समाजाच्या मागण्यांसंदर्भातील उपसमितीचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ही माहिती दिली.  


पाटील म्हणाले, मराठा क्रांती मोर्चाच्या मागण्यावर शासनाने योग्य कार्यवाही सुरू केली आहे. आर्थिक मागास शुल्कासाठी उत्पन्न मर्यादा सहा लाख करणे, ६०५ अभ्यासक्रमांचा समावेश शाहू महाराज शुल्क प्रतिपूर्ती योजनेत समावेश करणे, असे निर्णय घेतले आहेत. अाता महामंडळा मार्फत देण्यात येणाऱ्या सध्याच्या बीज भांडवल कर्ज योजना, गट प्रकल्प कर्ज योजना बंद करून नव्या योजनांना मान्यता देण्यात आली आहे. मराठा तरुणांना उद्योगांसाठी तीन योजना प्रस्तावित करण्यात आल्या होत्या. वैयक्तिक कर्ज व्याज परतावा, गट कर्ज व्याज परतावा, शेतकरी उत्पादक गट प्रकल्प कर्ज अशा या याेजना अाहेत. या तिन्ही योजनांत दिव्यांगासाठी चार टक्के निधी राखीव ठेवण्यात आला आहे. 


कर्जलाभाच्या ३ याेजना  
वैयक्तिक कर्ज व्याज परतावा
: या याेजनेत दहा लाखांपर्यंतचे कर्ज बँकेतून घेतल्यानंतर त्याचे व्याज महामंडळामार्फत लाभार्थीच्या खात्यात परत देण्यात येणार आहेत.   
गट व्याज परतावा : या योजनेत एका गटाने दहा लाख ते जास्तीत जास्त ५० लाखांपर्यंतचे कर्ज घेतल्यास त्याचे व्याज परत करण्यात येणार आहे.  
शेतकरी उत्पादक गट प्रकल्प : या याेजनेत महामंडळामार्फत या गटास दहा लाखांपर्यंत कर्ज बिनव्याजी मिळणार आहे.

बातम्या आणखी आहेत...