आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घरात नॉनव्हेज केल्याने नाट्यनिर्मात्याच्या कुटुंबियांना \'गुजरातीं\'कडून मारहाण

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाट्यनिर्माते गोविंद चव्हाण (फाईल फोटो) - Divya Marathi
नाट्यनिर्माते गोविंद चव्हाण (फाईल फोटो)
मुंबई- मराठी रंगभूमीवरील नाट्य निर्माते गोविंद चव्हाण यांच्या कुटुंबियांना घरात नॉनव्हेज बनविल्यामुळे गुजराती सुमदायाच्या लोकांनी शिवीगाळ व मारहाण केल्याची घटना उघडकीस आली आहे. याबाबत पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. गोविंद चव्हाण दहिसर पश्चिम येथील बोना व्हेन्चर या इमारतीत आपल्या कुटुंबियांसह राहतात. या इमारतीत 70 ते 80 टक्के जैन आणि मारवाडी समाजाची वस्ती आहे.
दरम्यान, मराठी माणसांची कोंडी होत असल्याचे सांगत शिवसेना त्यांच्या मदतीला धावली आहे. दहिसर विभागातील शिवसैनिकांनी नगरसेवक शीतल म्हात्रे यांच्या नेतृत्त्वाखाली गुजरातीं लोकांविरूद्ध सोसायटीच्या खालीच आंदोलन केले. यावेळी दोनशे शिवसैनिक उपस्थित होते.
नाट्यनिर्माते गोविंद चव्हाण यांनी सांगितले की, आम्ही घरात नॉनव्हेज, अंडी बनवितो म्हणून गेली अनेक दिवस सोसायटीतील मारवाडी व जैन समाजातील गुजराती लोक आम्हाला त्रास देत आहेत. मात्र, आता तर त्यांनी हद्दच केली. गुजराती लोकांनी आमच्या घरावर अंडी फेकत दरवाजाची मोडतोड केली. सोसायटीतील कोणाच्या तरी घरात खरखाटे पाणी खाली फेकले. तो संशय आमच्यावर घेण्यात आला. त्यामुळे सुमारे 30-40 जणांचा गट आमच्या दारासमोर आला व लाथाबुक्यांनी तोडफोड केली. यावेळी त्यांनी अतिशय खालच्या भाषेत शिव्याही दिल्या. आम्ही घरात नॉनव्हेज बनवत असतो. त्याचाच राग ठेवून त्यांनी माझ्या मुलीसह घरातील लोकांना सर्वांच्या समोर शिव्या दिल्या.
दरम्यान, या घटनेनंतर शिवसेनेने चव्हाण यांच्या पाठीशी उभे राहताना मुंबईत मराठी माणसांवर अशी वेळ येत असेल तर आम्हाला वेगळा विचार करावा लागेल असे सांगितले. गोविंद चव्हाण यांना जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत शिवसेना त्यांच्याशी पाठीशी राहील. मराठी लोकांनाच येथून विस्थापित होण्याची वेळ गुजरातींनी आणली आहे अशी टीका नगरसेवक शीतल म्हात्रे यांनी केली आहे.
पुढे आणखी वाचा...
बातम्या आणखी आहेत...