आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

विजय मल्ल्याविरोधात विशेष न्यायालयाचे अजामीनपात्र वॉरंट

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - काेट्यवधी रुपयांचे कर्ज बुडवणारा उद्योगपती विजय मल्ल्याला भारतात आणण्याच्या दृष्टीने आणखी एक पाऊल पडले आहे. ब्रिटन सरकारकडून मल्ल्याच्या प्रत्यार्पणासाठी आवश्यक असलेले अजामीनपात्र वॉरंट मुंबईच्या विशेष न्यायालयाकडून मिळवण्यात सीबीआयला यश आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. भारतातील अनेक बँकांची कर्जे बुडवून देशाबाहेर गेलेल्या मल्ल्याला अगोदरच सक्तवसुली संचालनालयाने फरार घोषित केले आहे.

आयडीबीआय बँकेचे ९०० कोटींचे कर्ज थकवल्याप्रकरणी फरार उद्याेगपती विजय मल्ल्याविरोधातील तपास पूर्ण करण्यासाठी त्याचा व्यक्तिश: ताबा मिळणे आवश्यक असल्याने त्याच्या प्रत्यार्पणाचे प्रयत्न केले जात आहेत. त्या दृष्टीने विशेष न्यायालयाकडून मल्ल्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट मिळाल्याने त्याच्या प्रत्यार्पण प्रक्रियेला गती मिळण्याची चिन्हे आहेत. सध्या मल्ल्या हा ब्रिटनमध्ये वास्तव्यास असून यापूर्वीही दोन स्वतंत्र प्रकरणांत त्याच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आले आहे. आपल्या किंगफिशर एअरलाइन्स या कंपनीसाठी देशातील एकूण सतरा बँकांकडून मल्ल्याने कोट्यवधींचे कर्जे घेतली आहेत. मल्ल्याकडून या सर्व बँकांना जवळपास सहा हजार कोटी रुपयांचे येणे बाकी आहे. या रकमेच्या वसुलीसाठी या सतरा बँकांनी एकत्रितपणे सध्या सर्वोच्च न्यायालयात कायदेशीर लढाई सुरू केली आहे.
बातम्या आणखी आहेत...