आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Not Allowing Wife To Wear Jeans, Kurta Amounts To Cruelty, Court Rules

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जीन्सला मज्जाव ठरेल घटस्फोटाचे कारण; मुंबईतील न्यायालयाचा निकाल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - पत्नीला कुर्ता-जीन्स परिधान करण्यास मज्जाव करून साडी नेसण्याचे बंधन घालणे हे एक प्रकारचे क्रौर्यच आहे. असे कृत्य केल्यास पतीपासून घटस्फोट घेण्याच्या दृष्टीने पत्नीसाठी ते एक सबळ कारण ठरू शकते, असा निवाडा मुंबईतील एका न्यायालयाने दिला आहे.

मुंबईच्या कौटुंबिक न्यायालयाने नुकताच एका महिलेच्या बाजूने हा निकाल दिला. मुख्य न्यायाधीश डॉ. लक्ष्मी राव यांनी विशेष विवाह कायदा 1954च्या 27 (1) ड अंतर्गत क्रौर्याला आधार ठरवत घटस्फोटाला मंजुरी दिली. या प्रकरणात महिलेच्या युक्तिवादानुसार डिसेंबर 2010 मध्ये लग्न झाल्यानंतर पती तिच्यासाठी नवीन कपडे खरेदी करत नव्हता.
यामुळे तिला तिच्या पगारातून कुर्ता व जीन्स विकत घ्यावी लागत होती. मात्र पतीने तिला हे कपडे घालण्याची परवानगी दिली नाही. तिला फक्त साडी घालण्याचीच मुभा होती. न्यायाधीशांनी निकाल देताना म्हटले आहे की, याचिकाकर्त्यांनी आपले म्हणणे सिद्ध केले असल्याने तिला घटस्फोट घेण्याची परवानगी दिली जात आहे. कुर्ता व जीन्स घालण्याची परवानगी न देणे हे कायद्यानुसार क्रौर्यच ठरते.
महिलेने याचिकेत अनेक आरोप केला होता की, तिचा पती व सासरची मंडळी तिच्याकडून 1 लाख रुपयांची मागणी करत होते. न्यायाधीशांनी हा निकाल देताना पतीकडून दरमहा 10 हजार रुपयांची पोटगी मिळण्याबाबतचा अर्ज मात्र फेटाळून लावला. तथापि, पतीने खटला लढवण्यासाठी पत्नीला 5 हजार रुपये द्यावेत, असे आदेश दिले.