आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Not Come Again In Film, Actress Minakshi Sheshadri Remark

चित्रपटात पुन्हा येणार नाही, अभिनेत्री मीनाक्षी शेषाद्रीचे मत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - बॉलीवूडमध्ये पुन्हा चित्रपट करण्यात आपल्याला रस नसल्याचे अभिनेत्री मीनाक्षी शेषाद्री हिने नुकतेच सांगितले. अमेरिकेत स्थायिक झालेली मीनाक्षी काही दिवसांपूर्वीच मुंबईत आली होती. या वेळी तिने हा खुलासा करून 'घायल'च्या सिक्वेलमध्ये आपण काम करणार नसल्याचे जाहीर केले. दरम्यान, मीनाक्षीने अभिनेता ऋषी कपूरसोबत सोशल साइटवर अपलोड केलेला फोटाे सध्या सर्वत्र चर्चेचा विषय बनला आहे.

मीनाक्षी शेषाद्रीच्या सौंदर्याची त्या वेळी बॉलीवूड आणि रसिकांमध्ये खूप चर्चा व्हायची. भरतनाट्यम्, कुचिपुडी, कत्थक, ओडिसी यासारख्या शास्त्रीय नृत्यांत पारंगत असलेल्या मीनाक्षीने काही िदवसांपूर्वीच वयाची ५१ वर्षे पूर्ण केली आहेत. मात्र, अजूनही ती ग्लॅमरस दिसते. ८०-९० च्या दशकात मीनाक्षी बॉलीवूडची आघाडीची अभिनेत्री होती. मीनाक्षीने हरीश मैसूर यांच्याशी विवाह केल्यानंतर बॉलीवूडमध्ये चित्रपट केले नाहीत. मुलगी केंद्रा आणि मुलगा जोश या दोन मुलांची आई असलेली मीनाक्षी अमेरिकेतील टेक्सासमधील प्लॅनो येथे राहते. तिथे ती डान्स अकॅडमी चालवते.

१७ व्या वर्षी मिस इंडिया
मीनाक्षीने वयाच्या १७ व्या वर्षी मिस इंडियाचा किताब पटकावला होता. मीनाक्षीने १९८२ मध्ये ‘पेंटर बाबू’ चित्रपटातून रुपेरी पडद्यावर पदार्पण केले होते. मात्र, १९८३ मध्ये आलेल्या 'हीरो' या चित्रपटाने तिला ओळख निर्माण करून दिली होती. या चित्रपटात जॅकी श्रॉफ याचीही भूमिका होती. मीनाक्षीने 'मेरी जंग', "घर हो तो ऐसा', 'घायल', 'दामिनी', 'घातक' यासारख्या अविस्मरणीय चित्रपटांत काम केले.

संतोषींना दिला होता नकार
मीनाक्षीने दिग्दर्शक राजकुमार संतोषी यांच्या अनेक चित्रपटांत काम केले होते. त्यामुळे त्या वेळी तिचे नाव संतोषी यांच्याशी जोडण्यात आले होते. संतोषी यांनीही मीनाक्षीकडे आपल्या प्रेमाची कबुलीही दिली होती. मात्र, तिने त्यांचा प्रस्ताव नाकारला होता. त्यावेळी मिनाक्षीने संतोषी यांच्या घायल, घातक आणि इतर चित्रपटात काम केले होते. त्यामुळे माध्यमांत दोघांचे प्रेमसंबंध असल्याच्या बातम्या प्रसारित झाल्या होत्या. त्यामुळे मिनाक्षीने कोणाचीही परवा न करता आपले असे संबंध नसल्याचे जाहीर करून सर्वांची बोलती बंद केली होती.