आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विराेधी अजेंडा राबवणा-या माध्यमांना घाबरू नका, अमित शहांचा सल्ला

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भाजपचे अध्यक्ष अमित शहा गुरुवारी मुंबईत अाल्यानंतर महिला कार्यकर्त्यांनी पारंपरिक पद्धतीने औक्षण करून स्वागत केले. - Divya Marathi
भाजपचे अध्यक्ष अमित शहा गुरुवारी मुंबईत अाल्यानंतर महिला कार्यकर्त्यांनी पारंपरिक पद्धतीने औक्षण करून स्वागत केले.
मुंबई - घोटाळ्याच्या आरोपांमुळे वादग्रस्त ठरलेल्या देवेंद्र फडणवीस सरकारमधील मंत्र्यांबाबत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा काय भू्मिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले असताना शहा यांनी त्यांची पाठराखण केली. काही लोक आपल्या भाजप मंत्र्यांच्या विरोधात अजेंडा चालवत असल्यासारख्या बातम्या चालवत आहेत. मात्र मीडियाला घाबरू नका. पंकजा मुंडे तसेच विनोद तावडे यांच्या पाठीशी भाजप पक्ष सक्षमपणे उभा आहे, असे शहा यांनी गुरुवारी सांगितले.
भाजपच्या सदस्य अभियानाच्या निमित्ताने शहा मुंबईत होते. वांद्र्याच्या रंगशारदा सभागृहात सकाळी संवाद साधण्यासाठी त्यांनी पत्रकारांना बोलावले खरे. मात्र, नंतर फक्त स्वत:चे फोटो काढून प्रसार माध्यमांशी बोलण्यास नकार दिला. मॅरेथाॅन बैठका पार पाडल्यानंतरच काही तासांनी त्यांनी थाेडक्यात संवाद साधला. मुंडेंचे चिक्की प्रकरण अन् तावडेंचे बोगस डिग्री प्रकरणात शहा यांनी चक्क त्यांची पाठराखण केली.

शहा म्हणाले, एखादी छोटी गोष्ट चॅनेलमध्ये वारंवार दाखवल्याने फरक पडत नाही. काही जणांकडून हे मुद्दामहून केले जात आहेत. पण, यामुळे बॅकफुटवर जाऊ नका. विरोधकांना त्यांच्याच शब्दांत उत्तर देण्याची तयारी ठेवा. पराभवाच्या मानसिकेमधून बाहेर या, असे शहा म्हणाले. पुढील आठवड्यात पावसाळी अधिवेशन सुरू होत असून त्यासाठी तयार व्हा. आतापेक्षा जास्त आक्रमकपणे विरोधक तुमच्यावर हल्लाबोल करतील. पण, खचून न जाता, सर्व ताकदीने त्यांचा सामना करा. एखादी खोटी गोष्ट सतत रेटून बोलत राहिली तर ती खरी वाटायला लागते. ती रोखायची असेल तर खोटी गोष्ट कशी तकलादू आहे, हे पटवून द्या, असा सल्लाही आमच्या मंत्र्यांना दिला आहे.

पुढे वाचा... राज्यातील १ कोटी सदस्य पक्षाचे खरे शुभचिंतक