आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Not Keep Aside Marath, Hindutva Issue Udhav Thakare

हिंदुत्व, मराठी मुद्दा सोडणार नाही! ,उद्धव ठाकरे यांचा ठाम निर्धार

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - ‘निवडणुकांआधी काँग्रेस पैसे वाटून मते खेचते. हे रोखण्यासाठी शिवसैनिकांनी जनजागृती करावी. निवडणुका कधीही होऊ शकतात, त्यासाठी सज्ज राहावे,’ असे आवाहन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बुधवारी शिवसैनिकांना केले. हिंदुत्व, मराठी आणि भूमिपुत्रांचा मुद्दा शिवसेना सोडणार नाही, असा निर्धारही व्यक्त केला.


शिवसेनेचा 47 वा वर्धापन दिन बुधवारी मुंबईच्या षण्मुखानंद हॉलमध्ये साजरा करण्यात आला. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर हा पहिलाच वर्धापन दिन असल्याने कार्यक्रम घेण्यात आला. इतर नेत्यांच्या भाषणाला कात्री लावण्यात आली. केवळ महापौर सुनील प्रभू यांनी भाषण केले, त्यानंतर उद्धव यांनी मार्गदर्शन केले. उद्धव म्हणाले की, आज सकाळपासून चर्चा सुरू आहे की, मी काय मार्गदर्शन करणार? आम्ही मार्ग बदललेला नसल्याने मार्गदर्शन करण्याची आवश्यकता नाही, असे मला वाटते. शरद पवार कालच परदेशात गेले. कशासाठी आणि कोठे ते ठाऊक नाही. येताना ते कोणती कल्पना आणतात ठाऊक नाही. आम्हाला कल्पना येथेच सुचतात, परदेशात जावे लागत नाही. एक्स्प्रेस वे, सी-लिंक, उड्डाणपूल याच्या कल्पना शिवसेनाप्रमुखांना येथेच सुचल्या.
रेसकोर्सवर उद्यान बांधण्याचीच योजनाही आम्हाला येथेच सुचली. तेथे आम्हाला ‘लवासा’ बांधायचे नाही. कल्पना सुचण्यासाठी सुपीक डोके असावे लागते नुसते खोके असून उपयोग नाही, अशी उपरोधिक टीकाही त्यांनी शरद पवारांचे नाव न घेता केली.


पवारांची झोप उडाली
एका सर्वेक्षणात शिवसेनेचे आमदार वाढणार असल्याचे जाहीर झाल्याने पवारांची झोप उडाली आहे. अजित पवार नेहमी माझ्या फोटोग्राफीच्या छंदावर टीका करतात. मात्र त्यांना कसला छंद आहे ते त्यांनी लोकांना दाखवावे. आम्ही जे काही करतो ते खुलेआम करतो. ‘बारामतीच्या ममद्याने आमच्या वाट्याला जाऊ नये’, असा इशाराही उद्धव यांनी दिला.


युती भक्कमच
राजनाथ सिंह काल भेटून गेले. त्यांनी युती भक्कम आहे, असे सांगितले. हिंदुत्वाच्या मुद्द्यावर युती भक्कमच आहे. आम्ही हिंदुत्ववादीच आहोत आणि नितीशकुमार यांचा हिंदूंना चिरडणारा सर्वधर्मसमभाव आम्हाला मान्य नाही. आम्ही हिंदुत्व आणि मराठीचा मुद्दा सोडणार नाही.