आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Not Need Non Agricultur Permission To Wineries: Ajit Pawar

राज्यातील वाईन उत्पादकांना अकृषक परवान्याची गरज नाही:अजित पवार

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - राज्यातील वाईन उत्पादक वाईनरीमध्ये येणा-या रेस्टॉरंटला आता अकृषक परवान्याची गरज भासणार नाही. मंगळवारी झालेल्या बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याबाबत संबंधित विभागाच्या अधिका-यांना निर्देश दिल्याचे समजते.

वाईन उद्योगांना नवसंजीवनी मिळावी यासाठी अजित पवार यांच्याकडे एका बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. आईजीबीपीचे अध्यक्ष जगदीश होळकर, आॅल इंडिया वाईन प्रोड्यूसर असोसिएशनचे सचिव राजेश जाधव यांच्यासह राज्य उत्पादन शुल्क, प्रधान सचिव महसूल आदि अधिकारीही उपस्थित होते.

राज्य सरकारतर्फे देण्यात येणा-या सबसिडीचा विषयही बैठकीत मांडण्यात आला आणि 12 कोटी रुपये सरकारकडून परत येणार असल्याचे निदर्शनास आणले. यावर अजित पवार यांनी एकरकमी आकडा सांगण्यापेक्षा वर्गवारी करून रिफंडची माहिती द्यावी. त्यानुसार अर्थसंकल्पात तरतूद करून पैसे परत दिले जातील असेही सांगितल्याचे समजते. वाईनरीजमध्ये रेस्टॉरंटला अकृषिक परवाना घेणे बंधनकारक असल्याचा मुद्दा असोसिएशनच्या पदाधिका-यांनी चर्चेला आणला.

वाईन टेस्ट करण्यासाठी येणा-यांना जागा हवी म्हणून रेस्टॉरंट बांधले जाते. या ठिकाणी त्यांना खाण्या-पिण्याच्या सोयी उपलब्ध करून दिल्या जातात. परंतु याच्या बांधकामासाठी अकृषक परवाना आवश्यक असल्याने रेस्टॉरंट उभारणे कठिण जाते. यावर पवार यांनी अकृषक परवान्याची अट शिथिल करावी असे निर्देश दिले.

राज्याचा विषय ठरवल्याने अडचण
राज्यात एकूण 70 ते 75 वाईनरीज असून त्यापैकी 27 युनिट आजारी आहेत. आजारी युनिटना पाठबळ लाभावे म्हणून फूड प्रोसेसिंगमध्ये केंद्र सरकारकडे तीन टक्के मदतीची मागणी करण्यात आली होती. परंतु केंद्रीय नियोजन विभागाने वाईन उद्योग फक्त महाराष्ट्रातच असल्याने हा राज्याच्या अखत्यारीतील विषय असल्याचे सांगून मदत देण्यास नकार दिल्याचे यावेळी असोसिएशनच्या वतीने बैठकीत सांगण्यात आले.