आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शरीरात असा झाला बदल, बीडच्या ललिताप्रमाणेच या लोकांनी सुदधा घेतला होता बोल्ड निर्णय

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
महिला कॉन्स्टेबल ललिता साळवे - Divya Marathi
महिला कॉन्स्टेबल ललिता साळवे

मुंबई- राज्यातील बीडमधील एक महिला कर्मचा-याने आपल्या वरिष्ठांना एक चिठ्ठी लिहून आपल्या सेक्स चेंज करून पुरुष बनण्यासाठी सर्जरी करण्यासाठी परवानगी मागितली आहे. मात्र, पोलिस विभागाने हे नियमाच्या विरोधात असल्याचे सांगत नकार दिला आहे. दरम्यान, गुरुवारी संबंधित महिलेने मुंबई हायकोर्टात एक याचिका दाखल केली असून, कोर्टाला यात दखल घेण्यास भाग पाडले आहे. महिला कॉन्स्टेबलच्या बोल्ड निर्णयामुळे पोलिस दलात खळबळ माजली आहे. फक्त तीच नाही तर मागील काही काळात अशी अनेक प्रकरणे समोर आली आहेत ज्यात अनेकांनी आपले सेक्स चेंज करून घेतले आहे किंवा तो सर्वांसमोर स्वीकारले आहे की, त्यांची बॉडी बाहेर दिसायला वेगळी आणि आत काहीतरी वेगली आहे. काय आहे महिला पोलिसाची सेक्स चेंज करण्याचे प्रकरण....

 

- बीड जिल्ह्यातील माजलगावमधील महिला कॉन्स्टेबल ललिता साळवे काम करत आहे. 
- ललिता वर्ष 2009 मध्ये पोलिस दलात रूजू झाली होती. 
- दोन महिन्यापूर्वी ललिताने बीड जिल्ह्याचे एसपी जी. श्रीधर यांना पत्र लिहले.
- ललिताने पत्रात लिहले की, तिच्या जेंडर आयडेंटिटी डिस्ऑर्डर आहे. ती मागील चार वर्षापासून आपल्या शरीरात होणारे शारीरिक हावभाव नोटिस करत होती, जे पुरुषांत दिसतात.
- एसपी श्रीधर यांनी ललित हिचा अर्ज डीजीपी सतीश माथूर यांना पाठवला. यानंतर सतीश माथूर यांनी ललिताशी संपर्क साधला. 
- यावेळी ललिताने त्यांना सांगितले की, मी जरी बाहेरून महिला असली तरी आतून सर्व पुरुषांचे गुणधर्माचा अनुभव घेते. 
- एक महिला म्हणून मला आता जीवन जगणे अशक्य असून, मला सेक्स चेंज करण्यासाठी जेजे हॉस्पिटलमध्ये बोलणे झाले आहे.
- ललिता यांनी डीजीपी माथूर यांच्याकडे एक महिन्याची ऑपरेशनसाठी सुट्टी मागितली आहे.
- मात्र, महाराष्ट्र पोलिस दलात अशी पहिलीच केस आल्याने ही नियमात बसत नसल्याचे पोलिस दलाचे म्हणणे आहे.

 

मुख्यमंत्र्यांनी दिले मदतीचे आश्वासन-

 

- आता या प्रकरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डीजीपी माथूर यांना आदेश दिले आहेत की, ललिताच्या अर्जाला मंजूरी द्यावी.  
- फडणवीस यांनी सांगितले की, "मी डीजीपी यांना या अर्जावर सहानुभूतीपूर्वक विचार करण्यास सांगितले आहे.
- यामुळे काही तांत्रिर आणि कायदेशीर मुद्दे उपस्थित होऊ शकतात. मात्र, त्यात गरजेनुसार बदल करावे लागतील. मला आशा आहे की, संबंधित महिलेला तिच्या इच्छेनुसार जगता येईल"

 

याआधीही अशी उदाहरणे आलीत समोर- 

 

- फक्त ललिताच नव्हे तर काही दिवसापूर्वी इंडियन नेवीची सेलर मनीष कुमार गिरीने आपले सेक्स चेंज केले आहे. ज्यामुळे तिला आपली नोकरी गमवावी लागली. 
- मनीष आता सबी गिरी बनली आहे. ललिता आपली नोकरी सोडू इच्छित नाही त्यामुळे तिने आपल्या विभागाची सेक्स चेंज करण्याआधी रीतसर परवानगी मागितली आहे व तेथे न्याय मिळाला नाही म्हणून तिने कोर्टात धाव घेतली आहे.
- आज आम्ही ललिता आणि सबीप्रमाणेच इतर काही लोकांना भेटवणार आहोत ज्यांनी आपला सेक्स चेंज करून घेतला आहे. किंवा आपल्या शरीरात झालेल्या बदलाबाबत समाजात खुलेपणाने सांगितले आहे.

 

पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, ललितासारख्या अशाच काही लोकांना....

बातम्या आणखी आहेत...