आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Not Only Crime Stop By Laws; R.R. Aba New Research Before Journalist

केवळ कायद्याने गुन्हे थांबणार नाहीत ; आर. आर. आबांना पत्रकारांसमोर साक्षात्कार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - डॉक्टरांवर पूर्वी हल्ले होत होते म्हणून आपण त्यांच्या संरक्षणासाठी विशेष कायदा केला. तसाच कायदा आता पत्रकारांनाही हवा आहे. परंतु केवळ कायदा केला म्हणून गुन्ह्यांचे प्रमाण कमी होत नाही, असे सांगत गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी बुधवारी पत्रकारांची बोळवण केली.


पत्रकार हल्लाविरोधी कृती समितीने बुधवारी ‘पनवेल ते वर्षा’ अशी कार रॅली काढली होती. आझाद मैदानावर गृहमंत्री आर. आर. पाटील या रॅलीस सामोरे गेले. ते म्हणाले, पत्रकारांचे स्वातंत्र्य अबाधीत राखणे शासनाचे कर्तव्य आहे. डॉक्टरांवरील हल्ले थांबण्यासाठी जसा कायदा बनवला, तसाच कायदा पत्रकारांसाठीही आगामी निवडणुकीपूर्वी बनवला जाईल.


तुम्ही केवळ हल्ले थांबावेत यासाठी कायदा मागता. परंतु शासन अधिक व्यापक विचार करत आहे. इतर राज्यांमध्ये पत्रकारांना निवृत्तिवेतन मिळते. मात्र, महाराष्‍ट्रात तशी सोय नाही. पत्रकारांच्या निवृत्ती वेतनासाठी काय करता येईल, याबाबत शासन विचार करत आहे. पत्रकारांना खोट्या गुन्ह्यांमध्ये अडकवले जाते, अशा अनेक तक्रारी आहेत. यापुढे पत्रकाराच्या विरोधात आरोपपत्र दाखल करताना वरिष्ठ पोलिस अधिकारी सदर गुन्ह्याची खातरजमा करतील. त्यानंतरच आरोपपत्र दाखल करण्यात येईल, असेही पाटील म्हणाले.