आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘आदर्श’ला पर्यावरण परवानगी नव्हतीच - राज्य सरकारची कबुली

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

‘ मुंबई - आदर्श सोसायटी घोटाळ्याची चौकशी अंतिम टप्प्यात आली असताना या सोसायटीला केंद्रीय पर्यावरण विभागाने परवानगी दिली नव्हती, अशी कबुली राज्य सरकारने जयपाल पाटील आयोगासमोर दिली आहे.
तब्बल दोन वर्षे या प्रकरणाची चौकशी सुरू होती. आयोगाने याबाबतचा अहवाल मार्च महिन्याच्या मध्यापर्यंत सरकारला सादर करणे अपेक्षित आहे. केंद्रीय पर्यावरण विभागाने 2003 मध्ये दिलेले पत्र सोसायटीने बांधकामाला मिळालेले ना हरकत प्रमाणपत्र समजण्याची चूक केल्याचे सरकारचे वकील अनिल साखरे यांनी सांगितले. 1967 च्या विकास नियंत्रण नियमावलीनुसार सोसायटी 31 मजल्यांचे बांधकाम करू शकत नव्हती, असेही सरकारने कबूल केले. यानिमित्ताने सरकारने प्रथमच सोसायटीकडे बांधकामासाठी आवश्यक परवानगी
नसल्याचे मान्य केले आहे.