आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Not Possible To Move Sundar Elephant, State Government Information In High Court

सुंदर हत्तीला बंगळुरूला स्थलांतरित करणे शक्य नाही,राज्य सरकारची उच्च न्यायालयात माहिती

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - कोल्हापूर जिल्ह्यातील वारणा नगर येथील जोतिबा मंदिरातील सुंदर हत्तीला बंगळुरूला स्थलांतरित करणे शक्य नसल्याचे राज्य सरकारने गुरुवारी उच्च न्यायालयात सांगितले. याप्रकरणी पीपल्स फॉर एथिकल ट्रीटमेंट टू अ‍ॅनिमल्स (पेटा) या संस्थेने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. पेटाने सुंदरबाबत आवाज उठवल्यानंतर त्याला मंदिरातून एका शेडमध्ये ठेवण्यात आले आहे. मात्र, तो वन विभागाच्या अधिका-यांना ट्रकमध्ये बसण्यासाठी अजिबात सहकार्य करत नसल्याचे शासनाकडून सांगण्यात आले.