आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्राधान्यक्रम डावलून कुंभमेळ्याला पाणी सोडणे अयोग्यच - मुंबई उच्च न्यायालय

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - धरणांतील उपलब्ध पाणी पिण्यासाठी पुरवण्यास सर्वोच्च प्राधान्य आहे. त्यापाठोपाठ उद्योग, शेती आणि पर्यावरणासंबंधी उद्देशांचा प्राधान्यक्रम लागतो. या चारही गरजा पूर्ण झाल्यानंतरच कुंभमेळा किंवा इतर धार्मिक कार्यासाठी पाणी सोडले जावे, असे स्पष्ट निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने शुक्रवारी दिले.

मराठवाड्याला समन्यायी पाणीवाटपासाठी दाखल जनहित याचिकेवर निकाल देताना १९८ पानी निकालपत्रात उच्च न्यायालयाने म्हटले आहे की, पाणीवाटपासाठी राज्य सरकारने जलयोजना तयार केल्याचे दिसत नाही. सरकारने त्यासाठी पावले उचलावीत.

मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात समन्यायी पाणीवाटपाचा प्रश्न जनहित याचिकांमध्ये उपस्थित करण्यात आल्याचे न्यायालयाने नमूद केले. राज्य सरकारच्या जलनियामक प्राधिकरण कायद्यानुसार दुष्काळी परिस्थितीत प्राधान्यक्रम डावलून एखाद्या धार्मिक कार्यासाठी पाणी सोडण्याचा निर्णय प्राधिकरण घेऊ शकत नाही, असेही न्यायालयाने म्हटले आहे.

गेल्या वर्षी मराठवाड्यासह राज्याच्या अनेक भागांत दुष्काळाचे चटके बसत असताना नाशिकच्या कुंभमेळ्यासाठी पाणी सोडण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. या पार्श्वभूमीवर दाखल याचिकांवर उच्च न्यायालयाने उपरोक्त निर्देश दिले.
बातम्या आणखी आहेत...