आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी करण्याचा राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- विदर्भातील चंद्रपूर जिल्ह्यात संपूर्ण दारूबंदी करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य सरकारने आजच्या कॅबिनेट बैठकीत घेतला. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने हा निर्णय घेण्यात आला आहे. विधानसभा निवडणुकीत मुनगंटीवार आणि भाजपने सत्तेत आल्यास चंद्रपूर जिल्ह्यात संपूर्ण दारूबंदी करेल असे आश्वासन दिले होते. दरम्यान, वर्धा, गडचिरोली जिल्ह्यांपाठोपाठ आता विदर्भातील तिस-या जिल्ह्यात संपूर्ण दारूबंदी झाली आहे.
शेजारच्या जिल्ह्यात दारूबंदी असल्याने चंद्रपूर जिल्ह्यात दारूची मोठ्या प्रमाणात निर्मिती होत होते. यामुळे चंद्रपूर जिल्ह्यात आसपासच्या जिल्ह्यातील लोक दारूसाठी येत असत. त्यामुळे चंद्रपूर जिल्ह्यात दारूंचा धंदा फोफावला होता. त्यामुळे घरातील पुरुष मोठ्या प्रमाणात दारू पित असत. त्यामुळे या परिसरातील महिला दारूने त्रस्त होत्या तर पुरुष दारूने ग्रस्त होते. अखेर राज्य सरकारने दारूबंदीचा निर्णय घेतला आहे.
अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दारूबंदीचा निर्णय झाल्याबद्दल आनंद व्यक्त केला आहे. चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदीचा निर्णय झाल्याने आता त्याची प्रभावीपणे अंमलबजावणी करणार आहे. त्याचबरोबर अंमलबजावणीसाठी नियमांमध्ये आवश्यक बदल करणार असल्याचे मुनगंटीवार यांनी म्हटले आहे. जिल्ह्यात दारुबंदीचा निर्णय झाला नसता, तर आपण मंत्रिपदाचा राजीनामा देण्यास मागेपुढे पाहिले नसते असेही सांगितले.
पुढे छायाचित्राच्या माध्यमातून पाहा... चंद्रपूरमध्ये दारूबंदीची का होती मागणी...