आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Now Collector Give Helping Fund To Rape, Acide Victims

कलेक्टरच्या मंजुरीनेच मिळणार बलात्कार, अ‍ॅसिड हल्ल्यातील पीडित माहिलांना मदत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - बलात्कार वा अ‍ॅसिड हल्ल्याला बळी पडलेल्या महिलांना आता जिल्हाधिकार्‍यांच्या अध्यक्षतेखालील समितीने संमती दिल्यानंतरच आíथक मदत देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. यापूर्वी फक्त ‘एफआयआर’च्या आधारावर मदत दिली जात असे.

दिल्लीतील सामूहिक बलात्कारानंतर कडक कायदे करण्यात आले तरीही राज्यातील महिलांवरील अत्याचार थांबलेले नाहीत. पूर्वी सामूहिक बलात्काराचा एफआयआर नोंदवल्यानंतर पीडित महिलेला तत्काळ 50 हजार रुपये दिले जात असत. तर अँसिड हल्ला वा एकतर्फी प्रेमातून हल्ला झाल्यास दोन ते तीन लाख रुपयांची मदत एफआयआरनंतर राज्य सरकार देत असे. महिला व बालविकास विभागाने ही मदत वाढवण्याचा प्रस्ताव वित्त विभागाला दिला होता. 26 कोटी रुपयांचा हा प्रस्ताव वित्त विभागाने मंजूर केला असून आता तो लवकरच मंत्रिमंडळ बैठकीपुढे सादर केला जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. नव्या नियमानुसार, बलात्कार पीडित महिलेला दोन लाख तर सामूहिक बलात्काराची शिकार झाल्यास तीन लाख रुपये देण्यात येतील.