आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

व्हॉट्सअॅपवर फिर्याद; एफआयआर मेलवर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- आता व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून पोलिसांकडे ऑनलाइन तक्रार करण्याची सुविधा प्रत्येक जिल्ह्यातील सर्वसामान्यांना उपलब्ध झाली आहे. मुंबई व नवी मुंबईसारखी मोठी आयुक्तालये यातून वगळली आहेत. औरंगाबाद शहरातील नागरिकांना ८३९००२२२२२, ७७४१०२२२२२ वर तर ग्रामीण भागातील नागरिकांना ९८८१९३२२२२, ७७६८९३२२२२ या क्रमांकावर फिर्याद नाेंदवता येईल.
दुसरीकडे, पोलिस ठाण्यात तक्रार केल्यानंतर त्याची एफआयआर प्रत तक्रारदाराच्या ई-मेलवर मिळेल, अशी व्यवस्था उभारण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत.