आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आता राज्यातील प्रत्येक तालुक्यात क्रीडा अधिकारी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - राज्यातील ग्रामीण भागात नवे खेळाडू घडवण्यासाठी क्रीडा तालुका अधिकारी आणि क्रीडा मार्गदर्शकांची नवी पदे तत्काळ भरण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला असून तालुका क्रीडा अधिकार्‍यांची 69 तर मार्गर्शकांची 138 नवी पदे लवकरच भरण्यात येणार आहेत.
2012 मध्ये राज्याचे क्रीडा धोरण घोषित करण्यात आले. त्यानुसार विभागाच्या सक्षमीकरणाचा निर्णय राज्य शासनाने घेतला. खेळाला प्रोत्साहन देणे, खेळाडू व मार्गदश्रक शोधणे, पदकप्राप्त खेळाडू घडवणे व त्यासाठी प्रत्येक तालुक्यातालुक्यात सुविधा निर्माण करण्याचा निर्णय घेतला गेला.
राज्यात 35 जिल्हे असून 358 तालुके आहेत. मात्र, आजपर्यंत राज्यात केवळ 31 क्रीडा अधिकारी आणि त्यांना मार्गदश्रन करण्यासाठी प्रत्येकी दोन याप्रमाणे 62 क्रीडा मार्गदर्शक इतके अल्प मनुष्यबळ राज्याच्या क्रीडा विभागाकडे उपलब्ध होते. तालुका अधिकार्‍यांची 69 तर मार्गदर्शकाची 138 पदे भरण्याचा निर्णय उच्चस्तर समितीने ऑगस्टमध्ये घेतला होता. परंतु, त्यास अर्थ विभागाची मंजुरी मिळणे बाकी होते. नव्या पदभरतीस वित्त विभागाने हिरवा कंदील दाखवला आहे.
सध्या 51 तालुक्यांमध्ये क्रीडा संकुलाची कामे पूर्ण झाली आहेत. मार्चपर्यंत 100 तालुक्यांतील संकुले पूर्णत्वास जाणार आहेत. क्रीडा संकुले असलेल्या तालुक्यांनाच प्राधान्यांने अधिकारी नेमले जाणार आहेत.