आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Now Emergency Medical Service For Injured In Accident

अपघातातील जखमींसाठी आता आपत्कालीन वैद्यकीय सेवा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - रस्ते अपघातातील जखमींना त्वरित मदत मिळावी व मृत्युमुखी पडणा-यांची संख्या कमी होण्यासाठी दोन महिन्यांत राज्य सरकार आपत्कालीन वैद्यकीय सेवा सुरू करणार आहे. या सेवेशी संबंधित मुंबईत 168 ऑर्थोपेडिक आणि जनरल सर्जनना प्रशिक्षण देण्यात आल्याची माहिती आरोग्यमंत्री सुरेश शेट्टी यांनी दिली.


शेट्टी म्हणाले, राज्यात दरवर्षी साधारण 75 हजार अपघात होतात. वेळेवर जखमींना उपचार न मिळाल्याने मृत्युमुखी पडणा-यांची संख्या वाढत आहे. ग्रामीण भागात हे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे आपत्कालीन वैद्यकीय सेवा सुरू करण्याची योजना दोन वर्षांपूर्वी राज्य सरकारने आखली. राज्यात 937 विशेष रुग्णवाहिका सुरू करण्यात येणार आहेत.