आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्राॅव्हिडंट फंडातून रक्कम काढण्यावर झाले एकमत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- एखादा कर्मचारी जर दाेन महिने नाेकरीवाचून असेल तर अशा प्रकरणामध्ये त्या कर्मचाऱ्याला अापल्या प्राॅव्हिडंट फंडातील एकूण ठेव रकमेपैकी ७५ टक्के रक्कम मुदतीपूर्वी काढता येेऊ शकेल. उर्वरित २५ टक्के रक्कम ही त्या व्यक्तीला वयाच्या ५८ व्या वर्षी मिळेल. कामगार मंत्रालय प्राॅव्हिडंट फंडातून मुदतीपूर्वी रक्कम काढण्यावर मर्यादा अाणण्याचा विचार करत होते. शुक्रवारी झालेल्या बैठकीत कामगार संघटनादेखील या निर्णयाशी सहमत झाल्या आहेत.

जर एखाद्या कर्मचाऱ्याला दाेन महिन्यांमध्ये काेठेही नाेकरी मिळू शकली नाही तर त्याला अापली फंडातली रक्कम मुदतीपूर्वीच काढता येऊ शकते; परंतु अाता मुदतीपूर्वी रक्कम काढण्यावर मर्यादा अाणण्याबाबत ठाम निर्णय घेण्याचा कामगार मंत्रालयाने विचार केला अाहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या विश्वस्तांनी (कामगारांच्या बाजूचे) शुक्रवारी झालेल्या एका बैठकीत या निर्णयाला पूर्णत: पाठिंबा दिला असल्याचे कामगार मंत्रालयाच्या अधिकाऱ्याने सांगितले.
मुदतपूर्व रक्कम काढण्यावर निर्बंध अाणण्यासाठी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी याेजनेत सुधारणा करावी लागणार असून त्यासाठी लवकरच कामगार मंत्रालय अध्यादेश काढणार असल्याचे अाॅल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसचे सचिव डी. एल. सचदेव यांनी सांगितले.