Home | Maharashtra | Mumbai | Now For The Meera-Bhayandar, The BJP-Shiv Sena-Jung

मीरा-भाईंदरमध्ये महापालिका निवडणुकीची चाहूल; राजकीय पक्ष झाले सज्ज

दिव्य मराठी वेब टीम | Update - Jul 11, 2017, 01:23 PM IST

मीरा-भाईंदरमध्ये महापालिका निवडणुकीची तारीख अजुन जाहीर झाली नसली तरी राजकीय पक्ष सज्ज झाल्याचे दिसत आहे.

 • Now For The Meera-Bhayandar, The BJP-Shiv Sena-Jung
  मुंबई- मीरा-भाईंदरमध्ये महापालिका निवडणुकीची तारीख अजुन जाहीर झाली
  नसली तरी राजकीय पक्ष सज्ज झाल्याचे दिसत आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने यासाठी चांगलीच तयारी चालवली आहे. त्यामुळे भाजपसमोर आपली सत्ता कायम राखण्याचे आवाहन असणार आहे. रविवारी भाजप-शिवसेनेने शहरात रॅली काढली तर सोमवारी देवेंद्र फडणवीस यांनी पाणीपुरवठा योजनेची कोनशिला बसवली.
  शिवसेना-भाजपमध्ये लढत?
  - मुंबई जिंकली, ठाणे जिंकले आता जिंकू मिरा-भाईंदर अशी शिवसेनेची घोषणा येथील घोषणा आहे. माजी आमदार गिलवर्ट मेंडोसा शिवसेनेत आल्याने शिवसेनची स्थिती मजबूत झाल्याचे मानण्यात येते. रविवारी शिवसेनेने विजय संकल्प रॅली घेतली यात एकनाथ शिंदे, गुलाबराव पाटील, खासदार राजन विचारे यांनी भाजपवर जोरदार टीका केली.
  - दुसरीकडे अभिनेता रविकिशन याच्या मदतीने भाजप प्रचार करत आहे. विशेषत: उत्तर भारतीयांना आकर्षित करण्याचा प्रयत्न भाजपकडून होत आहे. भाजपने मीरा रोड येथे रविवारी एका भोजपूरी गाण्याचे कार्यक्रमाचेही आयोजन केले होते.

Trending