आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आता सरकार करणार चारा उत्पादन आणि एकाधिकार खरेदी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- राज्यातील विशेषत: मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थितीमुळे जनावरांच्या चा-याचा मोठा प्रश्न निर्माण झाला असून सरकारने आता दुष्काळी भागासाठी चारा उत्पादन करण्याचा निर्णय घेतला असून मराठवाड्यातील अन्य जिल्ह्यांत हा कार्यक्रम राबवला जाणार आहे तर या चा-याची खरेदी सरकारने एकाधिखार पद्धतीने करून उत्पादकांना दिलासा द्यावा, असा प्रयत्न असल्याची माहिती कृषिमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी दिली.

मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यांत पाण्याचे दुर्भिक्ष्य जाणवत असून लोकांना 40-50 किमी अंतरावरून पाणी आणावे लागते आहे. मराठवाड्यातील औरंगाबाद,जालना, बीड, उस्मानाबाद या जिल्ह्यांमध्ये चा-या ची परिस्थीती बिकट झाली आहे त्यामुळे लगतच्या हिंगोली, नांदेड आणि परभणी या जिल्ह्यात चारा उत्पादन करण्याचा सरकारचा विचार आहे. या जिल्हयांतील 24 हजार हेक्टर परिसरात चारा लागवड करण्याचा कार्यक्रम हाती घेण्यात आला असून या माध्यमातून 10 लाख मेट्रीक टन चारा जूलै महिन्यापर्यंत उपलब्ध होईल, असा विश्वास विखे-पाटील यांनी व्यक्त केला आहे. 3200 रूपये किंमतीचे चा-या चे बियाणे या शेतक-या ना मोफत देण्यात आले.
कृषी विभागाच्या बैठका रद्द
दुष्काळी स्थिती गंभीर असताना प्रशासकीय अधिकारी आणि मंत्र्यांनीही दुष्काळी जिल्ह्यात जाऊन आढावा घ्यावा अशी आपली धारणा आहे. बैठकीसाठी जिल्हाधिका-यांना आणि अन्य अधिका-या ना मुंबईत मंत्रालयात यावे लागते. आठवड्यातून तीन ते चार वेळा फे-या माराव्या लागत असल्यामुळे दुष्काळी भागात लक्ष देणे त्यांना शक्य होत नाही.