आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शासकीय दूध खरेदी दरात जुलैपासून २ रुपयांची वाढ, गाईचे दूध ३५ तर म्हशीचे ४४ रुपये प्रतिलिटर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- शासकीय दूध योजनेमार्फत खरेदी करण्यात येणाऱ्या गाय म्हशीच्या दुधाच्या दरामध्ये प्रतिलिटर दोन रुपयांनी वाढ करण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी घेतला अाहे. एक जुलैपासून लागू हाेणाऱ्या या दरवाढीमुळे राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. दुधाच्या खरेदी दरात वाढ करण्याबाबत निर्णय घेण्यासाठी पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय मत्स्यव्यवसाय विभागाच्या प्रधान सचिवांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमण्यात अाली हाेती.
सद्य:स्थितीतील दूध खरेदी दर, उत्पादन खर्च या बाबींचा विचार करून समितीने केलेल्या दूध दरवाढीच्या शिफारशीला मुख्यमंत्र्यांनी मंजुरी दिली. त्यानुसार अाता गायीच्या दुधासाठी खरेदी दर आता २० रुपयांवरून २२ रुपये तर म्हशीच्या दुधाचा खरेदी दर आता २९ रुपयांवरून ३१ रुपये इतका हाेणार आहे. त्यामुळे शासकीय दूध योजनेमार्फत विक्री करण्यात येणाऱ्या गाय आणि म्हशीच्या दूध विक्री दरातही प्रतिलिटर दोन रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. गायीचे दूध ३५ रुपये प्रतिलिटर तर म्हशीचे ४४ रुपये प्रतिलिटर या दराने विक्री करण्यात येईल.
बातम्या आणखी आहेत...