आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Now In Maha New Medical Checking Guidlines Priciples

वैद्यकीय तपासणीची नवीन मार्गदर्शक तत्त्वे; आता न्यायवैद्यक तज्ज्ञ प्रत्येक जिल्ह्यात

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- बलात्कारित महिलेच्या वैद्यकीय तपासणीची नवी मार्गदर्शक नियमावली तयार करण्यात आली असून ती मंत्रिमंडळापुढे लवकरच मंजुरीसाठी ठेवण्यात येणार असल्याची माहिती आरोग्य राज्यमंत्री फौजिया खान यांनी मंगळवारी विधान परिषदेत दिली.

डॉ. दीपक सावंत यांनी बलात्कारात बळी पडलेल्या महिलेच्या वैद्यकीय तपासणीला विलंब होत असल्याचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यावर खान म्हणाल्या, एनजीओ, न्या. चंद्रशेखर धर्माधिकारी समिती आणि न्या. जे. एस. वर्मा समितीच्या शिफारशी लक्षात घेऊन पीडित महिलेच्या वैद्यकीय तपासणीत मूलभूत बदल करण्यात आले आहेत. तपासणीवेळी संबंधित महिलेचे छायाचित्र आणि हाताचे ठसे घेऊ नयेत तसेच पोलिस आणि इतर पुरुषांची तेथे उपस्थिती नसावी, असा दंडकही नव्या नियमावलीमध्ये अंतभरूत आहे. नव्या मार्गदर्शक नियमावलीची अंमलबजावणी व्हावी यासाठी वैद्यकीय आणि पोलिस अधिकार्‍यांना विशेष प्रशिक्षण देण्यात येईल. प्रत्येक जिल्ह्यात न्यायवैद्यक तज्ज्ञाची नेमणूक करण्यात येईल, अशी माहिती फौजिया खान यांनी दिली.

रेट बोर्डची डॉक्टरांना लवकरच सक्ती- खासगी डॉक्टरांनी तपासणी फी बोर्डवर लावण्यासाठी केंद्र सरकारचा कायदा राज्यात लागू करण्यात येईल, अशी माहिती खान यांनी परिषदेत दिली. काही राज्यांनी केंद्र सरकारचा 'क्लिनिकल एस्टॅब्लिशमेंट अँक्ट' स्वीकारला आहे. त्यामुळे अशा राज्यांमध्ये खासगी डॉक्टरांना रेट बोर्ड लावण्याची सक्ती आहे. महाराष्ट्राने अद्याप तो कायदा स्वीकारलेला नाही. लवकरच तो मंत्रिमंडळासमोर ठेवणार असल्याचे त्या म्हणाल्या.