आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुनर्गठित कर्जाची मुदत ३ वरून ५ वर्षे पहिल्या वर्षी संपूर्ण व्याजमाफी, मुख्यमंत्र्यांची घोषणा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- शेतकरी कर्जमाफीला नकार देत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी साेमवारी विधानसभेत पीक कर्जाच्या पुनर्गठनाची तयारी दाखवली. पुनर्गठित केलेल्या कर्जाची मुदत तीन वर्षांऐवजी आता पाच वर्षांसाठी वाढवण्यात येईल. त्यापैकी पहिल्या वर्षाचे संपूर्ण व्याज माफ केले असून पुढील चार वर्षांतील कर्जाच्या व्याजाचा अर्धा भाग सरकार भरणार आहे, अशी महत्त्वपूर्ण घाेषणा मुख्यमंत्र्यांनी केली.

आतापर्यंत राज्यातील २५ हजार गावांमधील २० लाख शेतकऱ्यांनी कर्जाचे पुनर्गठन केले असल्याचेही त्यांनी जाहीर केले.
मुख्यमंत्र्यांच्या इतर घोषणा
चारा पिकासाठी २५ कोटींची तरतूद, २ लाख हेक्टर क्षेत्रावर चारा पिके घेण्याचे नियोजन, कमतरता झाल्यास चारा डेपोचे नियोजन करणार.

- आणीबाणीच्या परिस्थितीत आकस्मिक योजना तयार आहे.

- कर्जावर आधारित शेती अर्थव्यवस्थेऐवजी गुंतवणूक आधारित अर्थव्यवस्था गरजेची आहे.

- विदर्भ-मराठवाड्यातील अनुशेष आजही शिल्लक . आत्महत्या करू शकतील असे १८ हजार शेतकरी होते. त्यांना २००८ मध्ये आधीचे सरकार विहिरी देणार होते, पण त्या दिल्या नाहीत. गेल्या सहा महिन्यांत त्यापैकी ४ हजार विहिरी आम्ही पूर्ण केल्या आहेत.

- अनेक प्रकल्प भूसंपादनामुळे अडकले होते. नवीन भूसंपादन कायदा झाल्यापासून पाचपट पैसे शेतकऱ्याला देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतल्याने जमिनी उपलब्ध होत आहेत. लवकरच प्रकल्प मार्गी लावू.

- १ लाख १९ हजार ८८२ कामे जलयुक्त शिवार योजनेंतर्गत हाती घेतली आहेत. त्यापैकी ८६ हजार ६५७ कामे पूर्ण केली, तर ३३ हजार कामे प्रगतिपथावर आहेत. विकेंद्रीत पाण्याचे साठे निर्माण करण्याचे नियोजन.

- जलयुक्त शिवार योजनेंतर्गत आत्महत्याग्रस्त १४ जिल्ह्यातील ६१९ कोटींची कामे पूर्ण केली. ५१ हजार ५८८ कामांपैकी ३६ हजार ५८६ कामे पूर्ण केली.

- जिल्ह्याचे रिसोर्स मॅपिंग करणार. जी जुनी कामे झाली पण ज्यांचा सिंचनासाठी उपयोग होत नाही, ती वापरात आणण्यासाठी सिंचनाचा २५ टक्क्यांपर्यंत निधी राखून ठेवणार.

- सेवापुरवठा योजनेद्वारे भाडेतत्वावर िसंचनाची सोय. बचत गटांना इलेक्ट्रीक किंवा डिझेल पंप पुरवून सिंचन उपलब्ध करून देणार त्यातून २५ हजार तरूणांना रोजगार मिळणार असून १३८ कोटी रुपयांचा खर्च करणार.

- विदर्भ, मराठवाड्यात विद्युतीकरण करण्यासाठी संपूर्ण पैसे या अर्थसंकल्पात देणार
११ जिल्ह्यांत ५०% पेक्षा कमी पाऊस
राज्यात १३४ लाख ७० हजार हेक्टर क्षेत्रावर पेरण्या झाल्या असून १ जून ते २० जुलै या कालावधीत पन्नास टक्क्यांपेक्षा कमी पाऊस असलेले ११ जिल्हे आहेत. तेथे पाऊस न झाल्यास दुबार पेरणी करावी लागेल.१९ जिल्ह्यांत ५० ते ७५ टक्के एवढा पाऊस झाला आहे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
बातम्या आणखी आहेत...