आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हे महाराष्ट्रीयन पदार्थ झळकणार टपाल विभागाच्या तिकीटावर; हैदराबादी बिर्याणीचाही समावेश

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उकडीचे मोदक. - Divya Marathi
उकडीचे मोदक.

मुंबई-  टपाल विभागाच्या म्हणजेच पोस्टाच्या तिकीटांवर 2 महाराष्ट्रीयन पदार्थ झळकणार आहेत. भारतीय पोस्ट खात्याने प्रदर्शित केलेल्या भारतातील 24 खाद्यपदार्थांच्या पोस्ट तिकीटांमध्ये मोदक आणि वडापाव या पदार्थांना स्थान देण्यात आले आहे.

पोस्ट विभाग दरवर्षी नवनवीन पोस्टाची तिकीटे प्रदर्शित करत असते. यावेळी भारतीय खाद्यसंस्कृतीची झलक पाहायला मिळत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जागतिक खाद्य दिनी या स्टॅम्प्सचं प्रकाशन केले. उकडीचे मोदक हा गणेशोत्सव किंवा संकष्टी-अंगारकीला महाराष्ट्रातील घराघरात केला जाणार गोड पदार्थ आहे. त्यामुळे गणेशभक्तांच्या मनात या पदार्थाला वेगळेच स्थान आहे. उकडलेल्या तांदळाच्या पिठीत खोबऱ्याचे गोड सारण भरुन केल्या जाणाऱ्या मोदकांची चव अनेकांच्या जिभेवर रेंगाळते.

दुसरीकडे, वडापाव हा मुंबईतील सर्वात लोकप्रिय पदार्थ आहे. अनेकांसाठी वडापाव म्हणजे एकवेळचे जेवण आहे. घड्याळाच्या काट्यावर धावताना सर्वत्र मिळणारा वडापाव कुठेही पटकन खाता येतो आणि पोटाची भूक भागवता येते.

पुढील स्लाईडवर पाहा पोस्टाच्या तिकीटावर झळकणारे खाद्यपदार्थ

 

बातम्या आणखी आहेत...