आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मॅकडोनाल्ड आऊटलेटमध्ये मराठी मेन्यू कार्ड

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - महाराष्ट्रात व्यवसाय करत असतानाही मराठीत मेन्यू कार्ड न देणा-या विदेशी खाद्य पदार्थांच्या दुकानांना स्वाभिमानने संघटनेने हिसका दाखवताच लिटिल इटाली रेस्टॉरंटने मराठीत मेन्यू कार्ड देण्यास सुरुवात केली असून आता मॅकडोनाल्ड या मातब्बर कंपनीने राज्यभरातील सर्व आऊटलेटमध्ये पंधरा दिवसात मराठीत मेन्यू कार्ड देण्याचे आश्वासन दिल्याचा स्वाभिमानी संघटनेचे अध्यक्ष आणि काँग्रेसचे आमदार नितेश राणे यांनी दावा केला आहे.

राज्यभरात मॅकडोनाल्डस, बर्गर किंग, केएफसी, डॉमिनोज पिझ्झा देणारे हजारो आऊटलेट्स आहेत. या ठिकाणी मराठी माणूस आपल्या कुटुंबासह मोठ्या प्रमाणावर खाद्यपदार्थ खाण्यास जातो. मात्र, तेथील मेन्यू कार्ड मराठीत नसतात. मराठीत मेन्यू कार्ड द्यावीत यासाठी स्वाभिमानी संघटनेने मागच्या महिन्यात मोठ आंदोलन सुरू केले होते.

मुंबई, पुणे, लोणावळा,खंडाळा येथील अशा हॉटेल्सना त्याबाबत स्वाभिमानी संघटनेने निवेदन देऊन मराठीत मेन्यू कार्ड तयार करण्याचा इशारा दिला होता. त्यानंतर मुंबईतील प्रख्यात लिटिल इटाली हॉटेलने लगेचच स्वाभिमानीच्या मागणीला मान देऊन मेन्यू कार्ड मराठीत तयार केले आहे. आता मॅकडोनाल्डनेही मराठीत मेन्यू कार्ड देऊ, असे आश्वासन दिले आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वी खासदार रामदास आठवले यांच्या रिपाइंनेही मराठी खाद्यपदार्थांसाठी आंदोलन केले होते.