आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Now Metro Runing Thane ; Chief Minister Anouncing In Assembly

आता मेट्रो धावणार ठाण्‍यातही ; मुख्‍यमंत्र्यांची विधानसभेत घोषणा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - ठाणे मेट्रो प्रकल्पाची घोषणा मुख्‍यमंत्री पृथ्‍वीराज चव्हाण यांनी आज विधानसभेत केली. मुंबई महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरणाच्या बैठकीत प्रकल्पाला मंजुरी दिली जाणार आहे. राज्यात आता मुंबई, पुणे, नागपूर यानंतर ठाण्‍यातही मेट्रो धावणार आहे.


ठाण्‍यातील मेट्रो संदर्भात विधानसभेत आमदार प्रताप सरनाईक आणि एकनाथ शिंदे यांनी विचारलेल्या प्रश्‍नाला उत्तर देताना मुख्‍यमंत्री पृथ्‍वीराज चव्हाणांनी मेट्रोची घोषणा केली. मेट्रो प्रकल्पासाठी 50 टक्के कर्ज , केंद्र 20, राज्य 20 आणि ठाणे महापालिका 10 टक्के याप्रमाणात निधी उभारला जाणार आहे. राज्याने या प्रकल्पासाठी 7 हजार 335 कोटी रूपये मंजूर केले आहेत.