आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

\'MIM\'च्या अकबरूद्दीन ओवेसींची आता सेनेच्या बालेकिल्ल्यात सभा, पोलिसांची परवानगी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- पुण्यातील मुस्लिम आरक्षण परिषदेत एमआयएमचे नेते खासदार असाऊद्दीन ओवेसी यांच्या जाहीर सभेनंतर आता त्यांचे बंधू अकबरूद्दीन ओवेसी यांची सभा मुंबईत होत आहे. येत्या शनिवारी मुंबईतील नागपाड्यात सायंकाळी ही जाहीर सभा होणार आहे. दरम्यान, पुणे, नागपूरपाठोपाठ आता मुंबईतील सभेलाही शिवसेनेने विरोध केला आहे. मात्र, मुंबई पोलिसांनी ओवेसी यांच्या सभेला परवानगी दिल्याने शिवसेना काय भूमिका घेते हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
ओवेसी यांच्या जाहीर भाषणांना शिवसेनेचा विरोध असताना भाजपने मात्र त्यांच्या सभांना परवानगी देण्याचा सपाटा लावला आहे. त्यामुळे या मुद्यांवरून शिवसेना व भाजपात अंतर्गत वाद सुरु असल्याचे स्पष्ट होत आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नेते मा. गो. वैद्य यांनीही ओवेसींच्या सभांना विरोध करण्याचे कारण नसल्याचे म्हटले आहे. तरीही सेनेचा विरोध कायम आहे.
अॅक्शन कमिटी महाराष्ट्र व मूलनिवासी मुस्लिम मंचने कोंढव्यातील कौसरबाग येथे बुधवारी आयोजित केलेल्या मुस्लिम आरक्षण परिषदेस शिवसेनेने विरोध केला होता. तसेच हिंदुविरोधी वक्तव्य केल्यास सभा उधळून लावण्याचा इशारा शिवसेनेने दिला होता. तरीही पुणे पोलिसांनी काही अटी व शर्तींवर ओवेसींच्या सभेला परवानगी दिली होती. या घटनेचा निषेध म्हणून शिवसैनिकांनी बुधवारी हडपसर व कोंढवा भागात जोरदार निदर्शने केली होती. त्यामुळे खबरदारीचा उपाय व काहीही अनुचित प्रकार घडू नये म्हणून हजारो शिवसैनिकांना ताब्यात घेतले होते. ओवेसी यांची सभा पार पडल्यानंतर सायंकाळी साडेसातनंतर शिवसैनिकांना पोलिसांनी सोडून दिले होते.
आता पुन्हा एकदा ओवेसी यांचे बंधू अकबरूद्दीन यांनी मुंबईत सभेसाठी परवानगी मागितली आहे. मुंबई पोलिसांनी या सभेला कोणतेही अटीविना परवानगी दिली आहे. मुंबईतील नागपाड्यात येत्या शनिवारी ही सभा पार पडणार आहे. मात्र, शिवसेनेने मुंबईतील सभेलाही जोरदार विरोध केला आहे. ओवेसी हे जहालवादी व हिंदुविरोधी वक्तव्ये करीत असून, देशाच्या एकतेला धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे आमचा ओवेसी बंधूंच्या सभांना कायम विरोध राहील असे शिवसेनेच्या प्रवक्त्या निलम गो-हे यांनी म्हटले आहे.
पुढे वाचा, भाजपला हवे धुव्रीकरण, त्यामुळेच ओवेसींच्या सभांना परवानगी...