आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Now Mumbai Mixed In Celebration Of Popular Dandiya

गरबा-दांडिया स्पर्धेच्या माध्यमातून नेत्यांचा गुजराती मतांवर डोळा!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- निवडणुका तोंडावर आल्या असताना मुंबईसारख्या महानगरातील आमदार-खासदार आता जनतेपर्यंत पोहोचण्याची, त्यांच्यात मिसळण्याची कोणतीही संधी सोडत नाहीत, असे चित्र दिसत आहे. दहीहंडी, गणेशोत्सव व आता त्यानंतर नवरात्रोत्सवात राजकीय नेते चढा-ओढीने सहभाग घेत असून, लोकांच्या मनात घर करून राहण्यासाठी लोकांवर लाखो रूपयांची विविध स्पर्धेच्या नावाखाली उधळन करीत आहेत.
मुंबईत खासकरून गुजराती लोकांची वस्ती मोठी आहे. त्यातच दहीहंडी, गणेशोत्सवापेक्षा नवरात्री व दांडिया उत्सव जवळचा वाटतो. त्यामुळे गणेशोत्सव, दहीहंडीसारखे मराठी माणसांत लोकप्रिय उत्सव झाल्यानंतर आता मुंबईतील नेत्यांनी गुजराती व्होट बॅंक लक्षात घेत या उत्सवातही कोणतेही कसर राहणार नाही याची काळजी घेतल्याचे दिसून येते.
मागील महिन्यात मुंबईपासून ते ठाण्यापर्यंत सर्व राजकीय पक्षांनी व त्यांच्या-त्यांच्या नेत्यांनी दहीहांडी फोडण्यासाठी लाखों रूपयांची बक्षिसे ठेवली होती. आता त्यानंतर ज्या आमदार-खासदारांच्या मतदारसंघात गुजराती मतदारांची संख्या जास्त आहे त्यांच्यासाठी तेथील स्थानिक आमदार-खासदार व त्याचबरोबर इच्छुकांनी दांडिया स्पर्धेचे आयोजन केले आहे. या स्पर्धेत विजयी ग्रुपना कोणी महागडी कार, गाड्या, एलसीडी तर काही लाखांत रोख रक्कम देणार आहेत. उत्तर मुंबईत सर्वाधिक जास्त गुजराती आहेत. त्या भागात सर्वात जास्त दांडिया उत्सवाचे कार्यक्रम आयोजित केले आहेत.
पुढे वाचा, कोणी कोणी केले आयोजन आणि कोण सेलिब्रेटी आहेत....