आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Now Mumbai No Man Road Now Come To Policing Surveliance

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आता मुंबईच्या निर्जन स्थळांवर राहणार कडक पोलिस बंदोबस्त

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - शक्ती मिलमध्ये महिला छायाचित्रकारावर झालेल्या बलात्कारानंतर गृहविभाग खडबडून जागा झाले आहे. घटनेच्या पार्श्वभूमीवर गृहमंत्री आर.आर. पाटील मंगळवारी वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांची बैठक घेणार असून त्यात मुंबईतील निर्जन स्थळांवर कडक पोलिस बंदोबस्त ठेवण्याबरोबरच सीसीटीव्ही बसविण्याचे आदेश बजावण्यात येणार आहेत.

मुंबईत शक्ती मिलसारखी सुमारे 400 निर्जन ठिकाणी आहेत. सूत्रांनी सांगितले की, यापैकी काही ठिकाणे ही पडिक मिलची आहेत तर काही निर्जन रस्ते आहेत ज्या ठिकाणी रात्री साडे सातनंतर जाण्यास कोणीही धजावत नाही. कॉटन ग्रीनसह मुंबईतील एफसीआयची गोदामेही निर्जन स्थळांमध्ये गणली जातात. काही मिलच्या जागांचा वाद सुरू असल्याने ती जागा कोर्ट रिसिव्हरच्या ताब्यात आहे. कोर्ट रिसव्हिरला यासाठी प्रति महिना साधारण 25 हजार रुपये जागेच्या मालकाकडून दिले जातात. मात्र या पडिक मिलला कंपाउंड नसल्याने या जागा गुंडांचे आर्शयस्थान बनले आहेत. तसेच एफसीआयच्या गोदामांचा विस्तार प्रचंड मोठा असल्याने तेथे काय होते हे कोणालाही कळत नाही. अशा ठिकाणी गदरुल्ले आणि समाजकंटक मोठय़ा प्रमाणावर जमा होतात. शक्ती मिलची जागाही कोर्ट रिसिव्हरच्या ताब्यात आहे. या ठिकाणी ड्रग्जचा धंदा होतो आणि झोपडपट्टीतील तरुण या ठिकाणी दारू प्यायला येत असतात. पोलिसांना ही बाब ठाऊक असूनही त्यांनी दुर्लक्ष केल्यामुळेच बलात्कारासारखी घटना घडली.
असे म्हटले जात आहे.


राष्ट्रवादी पाठीशी
बलात्कार प्रकरण आणि डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्याप्रकरणी गृहमंत्री आर.आर. पाटील यांना हटवण्याची मागणी जोर धरू लागली होती. मात्र, राष्ट्रवादी पक्षाने गृहमंत्री आर.आर. पाटील यांच्या पाठीशी आपली पूर्ण शक्ती लावली आहे. राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था चांगली असून गृह विभाग चांगले काम करीत आहे. त्यामुळेच बलात्कार प्रकरणातील आरोपींना लगेचच ताब्यात घेण्यात आले. काही घटनांमध्ये आरोपींना पकडण्यास वेळ लागतो, परंतु आरोपींना अटक होईल. गृहमंत्र्यांना आता हटवल्यास जनतेत राष्ट्रवादीच्या विरोधात संदेश जाईल त्यामुळे सध्या तरी पाटील यांना न हटवण्याचा निर्णय पक्षाने घेतला असल्याची माहिती सूत्रांनी दिली.