आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

देश कोणाची खासगी मालमत्ता आहे काय? अमिरविरोधकांना पवारांनी सुनावले

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कराड येथे यशवंतराव चव्हाण स्मृतीस्थळावर शरद पवार व इतर नेते... - Divya Marathi
कराड येथे यशवंतराव चव्हाण स्मृतीस्थळावर शरद पवार व इतर नेते...
कराड- अमिर खानला देश सोडून जायला सांगायला हा देश काय त्यांची खासगी मालमत्ता आहे काय असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी अमिरविरोधकांना केला आहे. अमिर खानला केला जाणारा विरोध व त्याला देश सोडून जायला सांगणे हा सुद्धा असहिष्णूतेचाच नमुना आहे असेही त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, पवारांचे हे वक्तव्य शिवसेनेला प्रत्त्युत्तर असल्याचे मानले जात आहे. शिवसेनेने अमिर खानला सापाची उपमा देत पाकिस्तानातून निघून जायला सांगितले होते.
आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या 31 व्या स्मृतिदिनानिमित्त शरद पवार यांनी कराड येथील प्रीतिसंगमावर चव्हाण यांच्या स्मृतीस्थळी जाऊन चव्हाण यांना आदरांजली वाहिली. याप्रसंगी विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर, आमदार जयंत पाटील, शशिकांत शिंदे, लक्ष्मण पाटील, बाळासाहेब पाटील उपस्थित होते. त्यानंतर पवार बोलत होते.
पवार म्हणाले, अमिर खानने एक देशाचा नागरिक म्हणून आपल्या भावना मांडल्या आहेत. याविरोधात एवढा गहजब करण्याची गरज नाही. देशात धार्मिक वातावरण तयार होत आहे हे सर्वच जण म्हणत आहेत. तो काहीही चुकीचा बोलला नाही. खरे बोलूनही त्याच्याविरोधात मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया व्यक्त केल्या गेल्या. त्याच्यावर सडकून टीका केली गेली. हा सुद्धा असहिष्णूतेचाच प्रकार आहे. देशाने अमिर खानला मोठे केले असा प्रचार केला जात आहे मात्र त्याला कोणी देणगी दिलेली नाही. त्याने मेहनतीने सर्व काही मिळवले आहे. अमिर खानला देश सोडून जाण्यास सांगणा-यांचा हा देश खासगी मालमत्ता नाही असे सांगत पवारांनी अप्रत्यक्षरित्या शिवसेनेवर निशाणा साधला.
अमिर प्रश्नांवर आधी नो कॉमेंट आता समर्थन
अमिर खानच्या विरोधात मंगळवारी देशभर तीव्र प्रतिक्रिया उमटत होत्या. सोशल मिडियातूनही अमिरला लक्ष्य केले जात होते. बॉलिवूडमधील मंडळींही अमिरच्या विरोधात खुलेआम आली होती. मंगळवारी पवारांना अमिरच्या वक्तव्याबाबत छेडले असता त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नव्हती. अमिरपेक्षा शहीद कर्नल संतोष महाडिक यांचा विषय महत्त्वाचा आहे असे सांगत अमिरच्या प्रश्नांवर बगल दिली होती. आज मात्र पवार अमिर खानच्या समर्थनात मैदानात उतरल्याचे दिसले. तसेच त्याला विरोध करणा-यांच्या बापजाद्यांचा हा देश नाही असे सुनावले.
पुढे आणखी पाहा... यशवंतराव चव्हाणांना मुख्यमंत्र्यांनी वाहिली आदरांजली...