मुंबई- चार राज्यात दारूण झालेला काँग्रेसचा पराभव, त्यानंतर शरद पवारांनी काँग्रेस नेतृत्त्वाबाबत उठवलेले प्रश्नचिन्ह यावरून काँग्रेस व राष्ट्रवादीत ठिणगी पडण्याची शक्यता आहे. तसेच याचे संभाव्य परिणाम म्हणून या दोन पक्षात मागील 14 वर्षापासून असलेल्या आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता आहे. काँग्रेसचा एक गट राष्ट्रवादीबरोबर काडीमोड घ्यावा, असे म्हणत आहे तर, दुसरा थोडे धीराने घ्या म्हणत आहे. दरम्यान, दोन दिवसापूर्वी लागलेल्या निकालानंतर राष्ट्रवादी काँग्रेसही काँग्रेससोबतचा घरोबा तोडण्याचा विचार करीत आहे. त्यामुळेच गेली अनेक वर्षे राज्यासह केंद्रात संसार करणारे काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्ष दोघेही एकमेंकापासून घटस्फोट घेण्यापर्यंतच्या मतांपर्यत आल्याचे बोलले जात आहे. तसे झाले राज्यातही राजकीय क्षेत्रात मोठी उलथापालथ पुढील एक वर्षात होण्याची शक्यता वर्तविली जावू लागली आहे.
8 डिसेंबरला म्हणजे परवा महत्त्वाच्या चार राज्यांचे निकाल जाहीर झाले. त्यात काँग्रेसचा दारूण पराभव झाला. यात काँग्रेस पराभूत होईल असे बोलले जात होते पण इतका दारूण पराभव होईल असे काँग्रेस नेत्यांसह भाजपलाही वाटत नव्हते. मात्र, एकून विधानसभांच्या जागांच्या 70 टक्केपर्यंत जागा भाजपने जिंकल्या. त्यानंतर शरद पवारांनी आपल्या ब्लॉगद्वारे काँग्रेसला सुनावत दुबळे राज्यकर्ते लोकांना आवडत नसल्याचे सांगत कार्यपद्धती सुधारण्याचाच सल्ला दिला. हा सल्लाही काँग्रेसच्या जिव्हारी लागला. सोमवारी दिल्लीत काँग्रेस पक्षाच्या महत्त्वाच्या नेत्यांच्या बैठकीत शरद पवारांनी उपस्थित केलेल्या मुद्यांवर चर्चा झाली. त्यामुळे पवारांनी केलेल्या भाष्यची काँग्रेस पक्षाने दखल घेतली आहे. त्यामुळे या पवारांचे करायचे काय असा मुद्दा पुढे येत आहे.
पुढे वाचा, काँग्रेससह राष्ट्रवादीला का घ्यावासा वाटतोय घटस्फोट...