आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Now Night School Students Get Mid Day Meal, Chief Minister Request Sanctioned By Union Government

रात्रशाळांतील विद्यार्थ्यांनाही मिळणार पोषण आहार,मुख्यमंत्र्यांची विनंती केंद्राला मान्य

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - राज्यातील रात्रशाळांमधून शिकणार्‍या विद्यार्थ्यांनादेखील शालेय पोषण आहार योजनेचा लाभ मिळणार आहे. या संदर्भात मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केंद्र सरकारला यासंदर्भात विनंती केली होती. ती केंद्राने नुकतीच मान्य केली.

आजमितीस केंद्र सरकारच्या शालेय पोषण आहार योजनेतून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा, खाजगी अनुदानित, अंशत: अनुदानित, मदरसा, मक्तबा, बालकामगार अशा विविध शाळांना माध्यान्ह भोजन देण्यात येते. रात्रशाळांमधून शिकणारे विद्यार्थी मात्र या लाभांपासून वंचित होते. रात्रशाळांमधून शिकणारे विद्यार्थीदेखील आर्थिकदृष्ट्या कमकुवत गटातील असतात. कौटुंबिक, आर्थिक आणि इतर विविध कारणांमुळे हे विद्यार्थी नियमित शाळांमध्ये जाऊ शकत नाहीत. सकस आहाराअभावी त्यांच्याही आरोग्याची आबाळ होते. त्यामुळे या शाळांच्या विद्यार्थ्यांनाही शालेय पोषण आहार योजनेचा लाभ मिळावा, अशी मागणी स्वयंसेवी संस्थांकडून सातत्याने केली जात होती. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनीदेखील केंद्र सरकारला यासंदर्भात विनंती केली होती. यावर केंद्राच्या प्रोग्रॅम अँप्रूव्हल बोर्डाने सकारात्मक निर्णय घेत इतर शाळांप्रमाणे रात्रशाळांच्यादेखील पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना नियमितपणे आहार देण्याचे आदेश शिक्षणाधिकार्‍यांना जारी केले आहेत. त्यामुळे या निर्णयाचा लाभ रात्रशाळांमध्ये शिक्षण घेणार्‍या हजारो विद्यार्थ्यांना होणार आहे.