आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Now, Nitesh Rane Plays Marathi Manoos Card, Targets Gujaratis In Mumbai Who Praise Narendra Modi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मी गुजरातींबद्दल काहीही चुकीचे म्‍हटले नाही, माझी भूमिका कायमः नितेश राणे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- गुजराती लोकांबद्दल वादग्रस्‍त ट्विट केल्‍यानंतर उडालेल्‍या गोंधळावर नीतेश राणे यांनी पत्रकार परिषदेत आपल्‍या वक्‍तव्‍याचे समर्थन केले असून ट्विटरव माझी राजकीय भूमिका मांडली होती, असे म्‍हटले आहे. मी माझ्या ट्विटमध्‍ये कोणावरही वैयक्तिक टीका केली नव्‍हती. परंतु, माझ्या वॉलवर या लोकांनी खालच्‍या पातळीवर जाऊन प्रतिक्रिया दिल्‍या आहेत. 'मुंबई तुमची भांडी घासा आमची', असेही लिहिण्‍यात आले आहे. याची कोणी दखल घेतली नाही. मग माझ्याच विधानाची का दखल घेतली, असा सवालही त्‍यांनी यावेळी उपस्थित केला.

मी एका महिन्‍यापूर्वी ट्विट केले होते. त्‍यावरुन आता वाद झाला. याच मुद्यावर एका वृत्तपत्राने मुलाखत घेतली होती. मी जे काही बोललो ते राजकीय होते. मराठी आणि गुजरातींमध्‍ये तेढ निर्माण करण्‍याचा माझ्यावर आरोप झाला. परंतु, माझे ट्विट योग्‍य प्रकारे वाचले नाही. मी माझ्या वक्तव्‍यावर ठाम आहे. मी महाराष्‍ट्राचा आहे. मला महाराष्‍ट्राच्‍या भूमिचा अभिमान आहे. परंतु, ज्‍या गुजरातींना इथे राहून गुजरातचे गुणगान गायचे आहे, तर त्‍यांनी का गुजरातमध्‍ये जाऊ नये? त्‍यांना महाराष्‍ट्रापेक्षा गुजरात जास्‍त विकसित वाटतो. महाराष्‍ट्रापेक्षा तिथे जास्‍त फायदे आहेत. असे ज्‍यांना वाटत आहे त्‍यांनी खुशाल तिथे जावे. ही माझी राजकीय भूमिका आहे. माझा कोणत्‍याही प्रकारे जातीय किंवा प्रांतभेद करण्‍याचा हेतू नाही, असे नीतेश राणे म्‍हणाले.

महाराष्‍ट्रात राहणा-या अनेक गुजराती बांधवांना महाराष्‍ट्राचा अभिमान आहे. परंतु, असे अनेक जण आहेत ते इथे राहून गुजरातचे गोडवे गातात. त्‍यांच्‍याबद्दलच मी बोललो होतो. ते गुजरातचे मुख्‍यमंत्री नरेंद्र मोदींची स्‍तुति करतात. बडोदा किंवा गांधीनगरमध्‍ये राहणारे लोक पृथ्‍वीराज चव्‍हाण यांचे कौतूक करत नाही. ज्‍यांना मोदी प्रिय आहेत ते इथे का राहतात? मी ट्विटरवर भूमिका मांडल्‍यानंतर उलट माझ्यावर अनेक प्रकारे वैयक्तिक टीका करण्‍यात आली. त्‍याबद्दल कोणीच काही बोलत नाही. अतिशय वाईट शब्‍द वापरण्‍यात आले. त्‍याचे काय? मी एक राजकीय भूमिका मांडली आहे. त्‍यावर मी ठाम आहे. मी कोणतेही चुकीचे वक्तव्‍य केले नाही, असे नीतेश राणे यांनी स्‍पष्‍ट केले. काय म्‍हणाले होते नीतेश राणे, वाचण्‍यासाठी क्लिक करा पुढच्‍या स्‍लाईडला...