आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Now, Nitesh Rane Plays Marathi Manoos Card, Targets Gujaratis In Mumbai Who Praise Narendra Modi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ट्विट-बीट: टीकेचा रोख मोदींवर; गुजरातींवर नाही; नितेश राणेंचे नंतर सारवासारव

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- आपण गुजराती समाजाविषयी कुठल्याही प्रकारचे अनुचित उद्गार काढले नसून आपल्या टीकेचा रोख गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्यावर होता, अशा शब्दांत स्वाभिमान संघटनेचे अध्यक्ष नितेश राणे यांनी आपल्या ट्विटरबाजीचे समर्थन केले.

गुजराती समाजाविषयी केलेल्या वादग्रस्त ट्विटनंतर राणे यांच्यावर टीकेची झोड उठली. त्यानंतर राणे यांनी शनिवारी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली. राणे म्हणाले की, मी कुठलेही जातीयवादी वक्तव्य केलेले नाही. राजकीय भूमिकेतूनच मोदींवर टीका केली आहे.

काय म्हणाले होते नितेश
नरेंद्र मोदींना पाठिंबा देणार्‍या व्हाइट कॉलर गुजराती लोकांनी मुंबई सोडून गुजरातला जावे. जेणेकरून मराठी माणसाच्या विकासास आडकाठी येणार नाही, अशा आशयाचे ट्विट त्यांनी केले होते.

गुजरातेत जाऊन राहावे
अनेक मराठी गुजरातेत राहतात. त्या भूमीचा ते आदर करतात. गुजराती बांधवांनीही तसाच आदर ठेवावा. गुजरातचा विकास होतो असे वाटते, त्यांनी तेथे स्थायिक व्हावे, या भूमिकेत मी बदल करणार नाही. कारण, ते वक्तव्य गुजराती समाजाबाबत नव्हते. मोदींच्या विकासाच्या दाव्याबाबतचे ते राजकीय वक्तव्य होते.

विकासाचे दावे बिनबुडाचे
गुजरातच्या विकासाबाबतचे त्यांचे दावे बिनबुडाचे आहेत. विकास होतो आहे, असे वाटत नाही. अन्यथा, गुजराती तिकडेच जाऊन राहिले असते. वाद निर्माण करण्याचा माझा प्रयत्न नव्हता.

पर्यटनात महाराष्ट्र अव्वल
अमिताभ बच्चन यांना गुजरात सरकारने ब्रँड अ‍ॅम्बॅसेडर बनवले असले, तरी पर्यटनात महाराष्ट्रच प्रथम क्रमांकावर आहे. यावरून महाराष्ट्र विकासाच्या बाबतीत गुजरातपुढे आहे हे सिद्ध होते.

वक्तव्य तपासणार, आर. आर. पाटील
नितेश राणे यांचे गुजरातींविषयीचे वक्तव्य तपासून पाहण्यात येईल. विधानात काही आक्षेपार्ह आढळल्यास योग्य ती कारवाई करण्यात येईल भारतात कोणत्याही व्यक्तीस कुठेही राहण्याचा अधिकार आहे.
-आर. आर. पाटील, गृहमंत्री