आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लतादीदींचा भारतरत्न काढा, चांदोरकरपाठोपाठ नितेश राणेंची बडबड

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर- नरेंद्र मोदींचे कौतुक केल्यानंतर मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष जनार्दन चांदोरकर यांनी लतादीदींचा भारतरत्न पुरस्कार काढून घेण्याची मागणीवरून झालेले वादळ शमते ना शमते तोच नारायण राणे यांचे पुत्र नितेश राणे यांनीही लतादीदींचा भारतरत्न पुरस्कार काढून घेण्याची मागणी केली आहे.
नितेश राणे यांनी नागपूर येथे श्रमिक पत्रकार संघाच्या वार्तालाप कार्याक्रमात त्यांनी मोदींबरोबरच लता मंगेशकर यांच्यावर टीकास्त्र सोडले. राणे म्हणाले, महाराष्ट्र हे महान राज्य आहे. या राज्यामुळेच अमिताब बच्चनपासून ते शाहरूख खान यांचे नाव झाले आहे. मंगेशकर कुटुंबियांनी पुण्यात उभारलेल्या रूग्णालयाला राज्य सरकारने सवलती दिल्या आहेत. त्यामुळे रूग्णालयाच्या पुढच्या टप्प्याच्या उदघाटनाला खरे तर मुख्यमंत्र्यांना बोलवायला हवे होते. मात्र त्यांनी शेजारील राज्याच्या मुख्यमंत्र्यांना बोलावले.
महाराष्ट्र सरकारने पेडर रोडवरील पुलाला लता मंगेशकर यांचा विरोध लक्षात घेता सरकारने तो बांधला नाही. त्यामुळे रोज लाखो मुंबईकरांची आता गैरसोय होत आहे. एवढा सगळा रोष ओढावून घेतल्यानंतर आपल्या मातीतील लोकांना बोलावयचे सोडून शेजारील राज्यांच्या लोकांना बोलावयचे त्यांना शुभ आशीर्वाद द्यायचे हे चुकीचे धोरण आहे. ज्या मातीने आपल्याला मोठे केले व ज्याचे ऋण आपल्या डोक्यावर त्यांना सलाम केला पाहिजे, असे आमचे म्हणणे आहे.
नरेंद्र मोदी हेच खरे प्रांतवादी व फुटीरतेचे राजकारण करीत आहेत. मुंबईतील व्यापा-यांकडून सत्कार स्वीकारतात व त्यांनी दिलेली मदत व निधी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या स्मारकाला देतात. मग काय आमच्या महाराष्ट्रात महापुरुष नाहीत काय असा सवाल करीत टीकास्त्र सोडले. मोदी देशाच्या कानाकोप-यात गेले तरी गुजरात मॉडेलचे कौतुक करतात व प्रांतवाद करतात असा आरोपही नितेश राणे यांनी मोदींवर केला.