आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पद्मावती: निर्मात्यांना हवे 3D सर्टिफिकेशन; सेन्सॉर बोर्डाकडे केली तिसऱ्यांदा याचिका दाखल

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- संजय लिला भंसाळी यांनी 'पद्मावती' चित्रपटाच्या 3D सर्टिफिकेशनसाठी अर्ज केला आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दिग्दर्शक व Viacom 18 ने तिसऱ्यांदा सॅन्सॉर बोर्डाकडे अपील केले आहे. चित्रपटाच्या 3D ट्रेलरला सकारात्मक प्रतिसाद मिळाला असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. आतापर्यंत सेन्सॉर बोर्डाने या चित्रपटाच्या 2 डी वर्जनला परवानगी दिलेली नाही. चित्रपटाबाबत वाद निर्माण झाल्यानंतर या चित्रपटाची प्रदर्शनाची तारीख 1 डिसेंबरपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. 

 

पद्मावतीच्या स्क्रीनिंगला नाही परवानगी
- सेन्सॉर बोर्डाच्या सुत्रांनी सांगितले की, चित्रपटाच्या निर्मात्यांनी 3 डी (सर्टिफिकेशन) साठी अप्लाय केले आहे. नव्या अर्जावर विचार करण्यात येत आहे. तर चित्रपटाच्या 2 डी वर्जनसाठी यापूर्वीच अर्ज आला आहे. अशा स्थितीत आम्ही फक्त 3 डी भागालाच प्रमाणपत्र देऊ शकतो.

- दरम्यान सेन्सॉर बोर्डाला अर्जाची छाननी करायची आहे. बोर्डाचे सदस्य हा चित्रपट पाहिल्यानंतर त्याला प्रमाणपत्र देतील. सगळी प्रक्रिया नियमानुसार होईल. त्यामुळे आतापर्यंत चित्रपटाच्या स्क्रीनिंगला परवानगी देण्यात आलेली नाही. 

 

पुढील स्लाईडवर आणखी फोटो आणि माहिती

बातम्या आणखी आहेत...